Michael Slater

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Ashes मालिकेदरम्यान घरगुती हिंसाचार प्रकरणात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला अटक

स्लेटरने (Michael Slater) आपल्याच पूर्व पार्टनरचा पाठलाग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची वादात सापडण्याची मालिका सुरुच आहे. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा (Australian Cricket Team) कर्णधार टीम पेनला (Tim Paine) अश्‍लील संदेशांच्या वादामुळे कर्णधारपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर काही काळ क्रिकेटपासून दूरही राहावे लागले होते. आता ऑस्ट्रेलिया संघाचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध समालोचक मायकेल स्लेटरही (Michael Slater) वादात सापडला आहे. स्लेटरने आपल्याच पूर्व पार्टनरचा पाठलाग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. स्लेटरला काही महिन्यांपूर्वी त्याच्या पूर्व पार्टनरसोबत घरगुती हिंसाचाराच्या आरोपात अडकवण्यात आले होते, त्यानंतर पोलिसांनी स्लारला त्याच्या पूर्व पार्टनरला भेटण्यास किंवा भेटण्याचा प्रयत्न करण्यास बंदी घातली होती (Apprehended Violence Order- AVO). स्लेटरने या आदेशाचे उल्लंघन केले, त्यानंतर न्यू साउथ वेल्स पोलिसांनी त्याला अटक करुन लॉकअपमध्ये बंद केले.

दरम्यान, 51 वर्षीय मायकेल स्लेटरवर न्यू साउथ वेल्स पोलिसांनी AVO आणि जामीन अटींचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. बुधवार, 15 डिसेंबर रोजी सकाळी 7.45 च्या सुमारास स्लेटरला अटक करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये घरगुती हिंसाचाराचा पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर स्लेटरला अटक होण्याची ही दुसरी वेळ आहे. या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी, स्लेटरला सिडनीमध्ये त्याने पूर्व पार्टनरचा पाठलाग केल्याबद्दल आणि तिला वारंवार कॉल आणि संदेश पाठवल्याबद्दल अटक करण्यात आली. त्यानंतर तो मानसशास्त्रज्ञाची मदत घेणार असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. त्यानंतर स्लेटरला जामीन मंजूर करण्यात आला.

ऑस्ट्रेलियासाठी कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळले

ताज्या प्रकरणानंतर, स्लेटरला आता सिडनीच्या मॅनली लॉ कोर्टात हजर केले जाईल. स्लेटर दीर्घकाळ ऑस्ट्रेलियन संघाचा एक भाग होता, जिथे त्याने प्रामुख्याने सलामीवीराची जबाबदारी पार पाडली. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 74 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याच्या बॅटने 14 शतके आणि 21 अर्धशतकांसह 5312 धावा केल्या. त्याच वेळी, त्याने 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले, ज्यामध्ये त्याने 9 अर्धशतकांच्या मदतीने 987 धावा केल्या.

2003 मध्ये क्रिकेटमधून बाहेर पडल्यापासून, स्लेटर समालोचक आणि प्रसारक म्हणून जगाच्या विविध भागांमध्ये समालोचन करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तो इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) समालोचन संघाचाही भाग होता. मात्र, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणापासून ते भाष्य करण्यापासून दूर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'हा अपघात नव्हे, 25 जणांचा खून! हडफडे नाईटक्लब दुर्घटनेवरून आमदार लोबो संतापले; Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा 'चॅप्टर' कोणी 'क्लोज' केला?

नाताळची लगबग सुरू! सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या, दर 10 टक्क्यांनी वाढले

हडफडे क्लब आगीतील 3 मृतदेहांवर झारखंडमध्ये अंत्यसंस्कार; सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत

गोवा-शिर्डी, गोवा-तिरुपती थेट विमानसेवा सुरू करावी, सदानंद शेट तानावडेंची राज्यसभेत मागणी

SCROLL FOR NEXT