Glenn Maxwell Dainik Gomantak
क्रीडा

AUS vs AFG: 201 नाबाद! वानखेडेवर मॅक्सवेलचं वादळ, अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

Manish Jadhav

ODI World Cup 2023 AUS vs AFG: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला. एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 39 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 291 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सात गड्यांच्या मोबदल्यात 293 धावा केल्या आणि सामना जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली आणि 70 धावांच्या आतच त्यांचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

यानंतर ग्लेन मॅक्सवेलने कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीने डावाची धुरा सांभाळत ऑस्ट्रेलियाला (Australia) शानदार विजय मिळवून दिला. ग्लेन मॅक्सवेलच्या रुपात वानखेडेवर वादळ आले.

मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या सामन्यात मॅक्सवेलने शानदार दुहेरी शतक झळकावले. मॅक्सवेलने 201 धावांची तूफानी खेळी खेळली.

मॅक्सवेलने आपल्या खेळीत 10 षटकार आणि 21 चौकार लगावले

दरम्यान, या सामन्यात अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 292 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात 5 वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाने 7 विकेट्स गमावून सामना जिंकला. ग्लेन मॅक्सवेलने संघाकडून 128 चेंडूत 201 धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 10 षटकार आणि 21 चौकार मारले. तर पॅट कमिन्सने 68 चेंडूत नाबाद 12 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स अशा पडल्या

पहिली विकेट: ट्रॅव्हिस हेड (0), विकेट: नवीन उल हक, 4/1

दुसरी विकेट: मिचेल मार्श (24), विकेट: नवीन उल हक, 43/2

तिसरी विकेट: डेव्हिड वॉर्नर (18), विकेट: अजमतुल्ला उमरझाई, 49/3

चौथी विकेट: जोश इंग्लिस (0), विकेट: अजमतुल्ला ओमरझाई, 49/4

पाचवी विकेट: मार्नस लॅबुशेन (14), विकेट: रनआउट, 69/5

सहावी विकेट: मार्कस स्टॉइनिस (6), विकेट: राशीद खान, 87/6

सातवी विकेट: मिचेल स्टार्क (3), विकेट: राशीद खान, 91/7

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अद्याप सामना जिंकलेला नाही

अफगाणिस्तान संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकही सामना अद्याप जिंकता आलेला नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 4 एकदिवसीय सामने आणि 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला आहे. सर्व सामन्यांमध्ये फक्त कांगारु संघ विजयी झाला आहे.

झाद्रानने ऐतिहासिक शतकी खेळी खेळली

दरम्यान, या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर संघाने 5 विकेट गमावून 291 धावा केल्या. संघासाठी इब्राहिम झाद्रानने 143 चेंडूत 129 धावांची शानदार नाबाद शतकी खेळी करत इतिहास रचला.

वास्तविक, 21 वर्षीय झाद्रान विश्वचषकात शतक झळकावणारा पहिला अफगाणिस्तानचा फलंदाज ठरला. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 8 चौकार लगावले.

त्याच्याशिवाय राशिद खानने 35 आणि रहमत शाहने 30 धावा केल्या. झाद्रान आणि राशीद यांनी 5व्या विकेटसाठी 28 चेंडूत 58 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने 2 बळी घेतले.

अशा प्रकारे अफगाणिस्तानच्या विकेट पडल्या

पहिली विकेट: रहमानउल्ला गुरबाज (21), विकेट: जोश हेझलवूड, 38/1

दुसरी विकेट: रहमत शाह (30), विकेट: ग्लेन मॅक्सवेल, 121/2

तिसरी विकेट: हशमतुल्ला शाहिदी (26), विकेट: मिचेल स्टार्क, 173/3

चौथी विकेट: अजमतुल्ला ओमरझाई (22), विकेट: अॅडम झाम्पा, 210/4

पाचवी विकेट: मोहम्मद नबी (12), विकेट: जोश हेझलवूड, 233/5

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT