AFG vs AUS: अफगाणिस्तानच्या इब्राहिमचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक शतक! विराट-सचिनलाही पछाडलं

Ibrahim Zadran: वर्ल्डकप 2023 मध्ये अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.
Ibrahim Zadran
Ibrahim ZadranPTI
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, Afghanistan vs Australia, Ibrahim Zadran Century:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघात मंगळवारी (7 नोव्हेंबर) सामना होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत असेलल्या या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर विजयासमोर 292 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तनकडून 21 वर्षीय इब्राहिम झाद्रानने शतकी खेळी केली. त्याने 143 चेंडूत 129 धावांची नाबाद खेळी करताना 8 चौकार आणि 3 षटकार मारले. यासह त्याने मोठे विक्रम केले आहेत.

इब्राहिम झाद्रान हा अफगाणिस्तानचा वनडे वर्ल्डकपमध्ये शतक करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी अफगाणिस्तानकडून वर्ल्डकपमध्ये कोणालाही शतक करता आले नव्हते.

तसेच इब्राहिमचे हे वनडे क्रिकेटमधील पाचवे शतक आहे. त्यामुळे त्याने अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरील रेहमत शाह आणि रेहमनुल्लाह गुरबाजची बरोबरी केली आहे. रेहमत शाह आणि रेहमनुल्लाह या दोघांनीही वनडे क्रिकेटमध्ये प्रत्येकी 5 शतके केली आहेत. या यादीत 6 वनडे शतकांसह मोहम्मद शेहजाद अव्वल क्रमांकावर आहे.

Ibrahim Zadran
World Cup 2023: फलंदाजांसाठी भारतातील 'हे' मैदान बनले स्वर्ग, विश्वचषकाच्या इतिहासात झळकली सर्वाधिक शतके

डीकॉकला टाकले मागे

दरम्यान, इब्राहिमने हे शतक केले, तेव्हा म्हणजेच मंगळवारी त्याचे वय 21 वर्षे 330 दिवस इतके होते. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत शतक करणारा चौथ्या क्रमांकाचा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने क्विंटन डी कॉकला मागे टाकले आहे. डी कॉकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 21 वर्षे 341 दिवस वय असताना सिडनीत पहिले वनडे शतक केले होते.

  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले वनडे शतक करणारे सर्वात युवा क्रिकेटपटू -

    • 20 वर्षे 282 दिवस - मोहम्मद अश्रफुल (बांगलादेश), कार्डीफ, 2005

    • 21 वर्षे 138 दिवस - सचिन तेंडुलकर (भारत), कोलंबो, 1994

    • 21 वर्षे 309 दिवस - डेव्हिड गोवर (इंग्लंड), मेलबर्न, 1979

    • 21 वर्षे 330 दिवस - इब्राहिम झाद्रान (अफगाणिस्तान), मुंबई, 2023

    • 21 वर्षे 341 दिवस - क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका), कोलकाता, 2014

Ibrahim Zadran
World Cup 2023: श्रीलंकेचा बांगलादेशशी हस्तांदोलन करण्यास नकार! मॅथ्यूजनं सांगितलं, 'कारण त्यांनी आम्हाला...'

विराट-सचिनला पछाडलं

दरम्यान, इब्राहिम हा वनडे वर्ल्डकपमध्ये पहिले शतक करणाराही चौथ्या क्रमांकाचा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने याबाबद विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले आहे.

विराटने 22 वर्षे 106 दिवस वय असताना 2011 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरुद्ध पहिले शतक केले होते. तसेच सचिनने 1996 वर्ल्डकपमध्ये केनियाविरुद्ध 22 वर्षे 300 दिवस वय असताना पहिले शतक केले होते.

  • वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात कमी वयात पहिले शतक करणारे क्रिकेटपटू

    • 20 वर्षे 196 दिवस - पॉल स्टर्लिंग (आयर्लंड वि. नेदरलँड्स, कोलकाता, 2011)

    • 21 वर्षे 76 दिवस - रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज, जयपूर, 1996)

    • 21 वर्षे 87 दिवस - अविष्का फर्नांडो (श्रीलंका वि. वेस्ट इंडिज, चेस्टर-ल-स्ट्रीट, 2019)

    • 21 वर्षे 330 दिवस - इब्राहिम झाद्रान (अफगाणिस्तान वि. ऑस्ट्रेलिया, मुंबई, 2023)

    • 22 वर्षे 106 दिवस - विराट कोहली (भारत वि. बांगलादेश, मीरपूर, 2011)

    • 22 वर्षे 300 दिवस - सचिन तेंडुलकर (भारत वि. केनिया, कटक, 1996)

ऑस्ट्रेलियासमोर 292 धावांचे आव्हान

मंगळवारी होत असलेल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून इब्राहिमव्यतिरिक्त राशीद खानने 35 धावांची आक्रमक खेळी केली. तसेच रेहमत शाह (30), कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (26), अझमतुल्लाह ओमरझाई (22), रेहमनुल्लाह गुरबाज (21) यांनीही छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूडने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि ऍडम झम्पा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com