Crime News: रस्त्यावर रक्ताचे सडे अन् क्रूरतेचा कळस! सूडाच्या अग्नीत जळाला संसार; घटस्फोटित पत्नीच्या हत्येसाठी नराधमाने गाठली नीचतेची पातळी

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील नानपारा भागात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली.
Uttar Pradesh Crime
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील नानपारा भागात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली. एका नराधमाने आपल्या घटस्फोटित पत्नीची दुचाकीने बांधून रस्त्यावरुन फरपटत नेत हत्या करण्याचा प्रयत्न केला. या अमानवीय कृत्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. पीडित महिला आणि आरोपी दोघेही या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने उत्तर प्रदेशातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामगाव क्षेत्रातील मुसल्लमपुर येथील रहिवासी असलेल्या रहीस याने वर्षभरापूर्वी रेश्मा नावाच्या महिलेशी विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले आणि याच वादातून जानेवारी महिन्यात त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर रेश्मा आपल्या माहेरी नानपारा येथे राहत होती. बुधवारी आरोपी रहीस नानपारा परिसरात आला असता, लक्ष्मणपुर मतेही गावाजवळ त्याचा सामना रेश्माशी झाला. यावेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि रागाच्या भरात रहीसने हिंसक वळण घेतले.

Uttar Pradesh Crime
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

त्याने सुरुवातीला आपल्या दुचाकीने रेश्माला जोरदार धडक दिली, ज्यामुळे ती खाली कोसळली. तितक्यावरच न थांबता या नराधमाने रेश्माला दुचाकीला बांधले आणि भररस्त्यात फरपटत नेण्यास सुरुवात केली. रेश्माच्या किंकाळ्या ऐकून शेजारील शेतात काम करणारे मजूर आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिकांनी तातडीने दुचाकी थांबवून रेश्माची सुटका केली. संतापलेल्या जमावाने आरोपी रहीसला पकडून त्याची बेदम धुलाई केली, ज्यामध्ये तो देखील जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Uttar Pradesh Crime
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

याप्रकरणी पीडित महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन नानपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. क्षेत्राधिकारी पहुप सिंह यांनी सांगितले की, आरोपी रहीस विरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे आणि गुन्हेगारी धमकावणी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. घटस्फोटानंतरही सूडबुद्धीने केलेल्या या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com