IND vs AFG: अफगाणिस्तानला हरवणं सोपं नाही, 2019 च्या विश्वचषकातील 'हा' ब्लॉकबस्टर सामना तुम्ही विसरलात का?

India vs Afghanistan World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाने शानदार सुरुवात केली आहे.
Afganistan Team
Afganistan Team Dainik Gomantak
Published on
Updated on

India vs Afghanistan World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाने शानदार सुरुवात केली आहे. 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाचा सामना आता अफगाणिस्तानशी होणार आहे.

हा सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत फक्त 3 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये चुरशीची स्पर्धा होती.

शेवटच्या वेळी दोन्ही संघ एकदिवसीय सामन्यात आमनेसामने आले होते ते विश्वचषक 2019 दरम्यान. हा सामना अतिशय रोमांचक झाला होता. या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत करण्यासाठी टीम इंडियाला खूप संघर्ष करावा लागला होता.

अशा स्थितीत भारतीय संघ अफगाणिस्तानला कोणत्याही परिस्थितीत हलक्यात घेऊ इच्छित नाही.

2019 च्या विश्वचषकातील ब्लॉकबस्टर सामना

दरम्यान, 2019 च्या विश्वचषकात टीम इंडियाचा सामना 22 जून रोजी अफगाणिस्तानशी झाला होता. हा सामना द रोझ बाउल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला विजयासाठी 225 धावांचे लक्ष्य दिले होते.

टीम इंडियाच्या (Team India) घातक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तान संघाने हा सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. मोहम्मद नबी नाबाद 48 धावा करत क्रीजवर शानदार फलंदाजी करत होता आणि संघाला 6 चेंडूत 16 धावांची गरज होती.

मात्र वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात हॅट्ट्रिक घेत भारतीय संघाला 11 धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला होता.

Afganistan Team
IND vs AFG: कधी खेळवळी जाणार भारत-अफगाणिस्तान वनडे मालिका? BCCI सचिव जय शाह यांची पुष्टी

भारतविरुद्ध अफगाणिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड

अफगाणिस्तान संघ आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात भारताला पराभूत करण्यात अपयशी ठरला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत फक्त 3 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत.

या कालावधीत भारताने दोन सामने जिंकले आहेत. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. दोन्ही संघांमध्ये मार्च 2014 मध्ये सामना झाला होता. टीम इंडियाने हा सामना 8 विकेटने जिंकला होता. दुसरा सामना सप्टेंबर 2018 मध्ये खेळला गेला, हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर 2019 च्या विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले होते.

दरम्यान, या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाल्यास, अफगाणिस्तानला अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. अफगाणिस्तानला पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.

Afganistan Team
AFG vs PAK: हरिस रौफच्या झंझावातापुढे अफगाणिस्तानचा संघ पत्त्यासारखा कोसळला, 5 फलंदाज शून्यावर...

विश्वचषकासाठी संघ-

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, आर. सूर्यकुमार यादव..

अफगाणिस्तान- हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com