Australia Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final मध्ये टीम इंडियाला हरवल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल, पाहा खेळाडूंच्या रिऍक्शन्स

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये भारतीय संघाला पराभूत करून विजेतेपद जिंकल्यानंतरचा ऑस्ट्रेलियाचा ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Australia's Team celebration in dressing room: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने रविवारी कसोटी चॅम्पियनशीप २०२१-२३ स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले. इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय क्रिकेट संघाला २०९ धावांनी पराभूत केले.

त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया पहिला असा संघ ठरला आहे, ज्यांनी आयसीसीच्या सर्व स्पर्धेचे म्हणजेच वनडे वर्ल्डकप, टी२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि कसोटी चॅम्पियनशीपचे विजेतेपद मिळवले आहे.

याविजेतेपदानंतर ऑस्ट्रेलियन संघाने मोठा जल्लोष देखील केला. आयसीसीने त्यांच्या ड्रेसिंग रूममधील सेलिब्रेशनचाही व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलिया त्यांच्या विजयाचा आनंद घेताना दिसत आहे.

तसेच मार्नस लॅब्युशेन सेल्फी घेताना दिसतो. त्याशिवाय ऑस्ट्रेलियन खेळाडू एकमेकांना शुभेच्छा देण्याबरोबरच एकमेकांबरोबर आणि कसोटी चॅम्पियनशीपच्या मानाच्या गदेबरोबर फोटो काढताना दिसत आहे.

यावेळी काही ऑस्ट्रेलियन खेळाडू 'खूप छान वाटतंय' असंही म्हणताना दिसतायेत. याशिवाय खेळाडूंचे कुटुंबिय देखील यावेळी ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित होते. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाने जिंकला अंतिम सामना

भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात  63.3 षटकात सर्वबाद 234 धावाच करता आल्या. दुसऱ्या डावात भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली.

तसेच अजिंक्य रहाणेने 46 आणि रोहित शर्माने 43 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणाला फार काही खास करता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 174 चेंडूत 163 धावांची खेळी केली. तसेच स्टीव स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. तसेच भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 296 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली, तसेच शार्दुल ठाकूरने 51 धावा केल्या. याशिवाय रविंद्र जडेजाने 48 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून ऍलेक्स कॅरीने सर्वाधिक नाबाद 66 धावांची खेळी केली. तसेच मार्नस लॅब्युशेन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी 41 धावा केल्या.

भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हा डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीमुळे भारतासमोर 444 धावांचे आव्हान ठेवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT