Australia Cricket Team AFP
क्रीडा

NZ vs AUS: स्मिथ सलामीसाठी कायम, पहिल्या कसोटीसाठी कर्णधार कमिन्सने जाहीर केली 'प्लेइंग-11'

Australia Playing XI for 1st Test against New Zealand: डेव्हिड वॉर्नरने कसोटीतून निवृत्ती घेतल्यापासून स्टीव स्मिथने सलामीची जबाबदारी सांभाळली असून त्यालाच या भूमिकेसाठी कायम करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला आहे.

Pranali Kodre

Captain Pat Cummins confirmed Australia's playing XI for 1st test against New Zealand

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून (29 फेब्रुवारी) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनला होणार असून या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने एक दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियाने गेल्याच महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. दरम्यान, या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात खेळलेला 11 जणांचा संघच न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने कायम केला असल्याचे कर्णधार पॅट कमिन्सने सांगितले आहे.

त्यामुळे स्टीव्ह स्मिथ उस्मान ख्वाजासह सलामीला खेळताना दिसणार आहे. वॉर्नरने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर स्मिथ सलामीवीराच्या नव्या भूमिकेत दिसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठीही त्याला सलामीवीर म्हणून कायम करण्यात आले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाची मिचेल स्टार्क, कमिन्स आणि जोश हेजलवूड ही वेगवान गोलंदाजांची तिकडी सलग सहाव्या कसोटीत खेळताना दिसणार आहे. या तिघांचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

तसेच फलंदाजीत मधल्या फळीत मार्नस लॅब्युशेन, ट्रेविस हेड, कॅमेरॉन ग्रीन आणि मिचेल मार्श असतील. ग्रीन आणि मार्श हे गोलंदाजीही करताना दिसू शकतात. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी नॅथन लायन सांभाळेल.

अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन

स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरे, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल मार्श, नॅथन लायन, जोश हेजलवूड.

न्यूझीलंडला धक्का

या मालिकेतून न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवे बाहेर झाला आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच झालेल्या टी20 मालिकेदरम्यान कॉनवेच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याचमुळे त्याला कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे.

टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात होत असलेली कसोटी मालिकात सध्या चालू असलेल्या टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे. सध्या टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत न्यूझीलंड अव्वल क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलिया भारतापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

त्यामुळे आता पहिल्या दोन स्थानांवर राहण्यासाठी न्यूझीलंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात शर्यत असणार आहे. टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 पर्वाचा अंतिम सामना 2025 मध्ये लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT