AUS vs WI, Video: अफलातून! हातातील ड्रिंकचा एक थेंबही न सांडता चाहत्याचा एकहाती कॅच

Fan One Handed catch: ऑस्ट्रेलिया - वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात एका चाहत्याने हातातील ड्रिंक सांडू न देता अफलातून एकहाती झेल घेतल्याचे पाहायला मिळाले होते.
Fan grabs one-handed catch without spilling his drink
Fan grabs one-handed catch without spilling his drinkX/cricketcomau
Published on
Updated on

Fan grabs one-handed catch without spilling his drink:

मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघात टी20 मालिकेतील तिसरा सामना पार पडला. पर्थला झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने 37 धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात एका चाहत्याने घेतलेल्या झेलने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले.

एका चाहत्याने हातातील ड्रिंक खाली सांडू न देता एका हाताने एक भन्नाट झेल घेतला. झाले असे की या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजकडून आंद्रे रसेल आणि शेऱफेन रुदरफोर्ड फलंदाजी करत होते. यावेळी 16 व्या षटकात गोलंदाजीसाठी स्पेन्सर जॉन्सन आला.

त्याने टाकलेल्या एका अखुड टप्प्याच्या चेंडूवर रुदरफोर्डने फाईन लेगच्या दिशेने मोठा फटका मारला. त्यामुळे हा चेंडू षटकारासाठी गेला.

Fan grabs one-handed catch without spilling his drink
AUS vs WI: रसेल - रुदरफोर्डची चौकार-षटकारांची आतिषबाजी! ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची शाळा घेत रचला वर्ल्ड रेकॉर्ड

दरम्यान, हा चेंडू स्टँडमध्ये जात होता. यावेळी एका चाहत्याने सहज त्याचा उजवा हात वर करत तो चेंडू पकडला. विशेष म्हणजे हा चेंडू पकडत असताना त्या चाहत्याने दुसऱ्या हातातील त्याचे ड्रिंग खाली पडू दिले नाही.

त्याचा हा झेल पाहून त्याच्या आजूबाजूच्या प्रेक्षकांनीही त्याचे कौतुक केले. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाने सामना गमावला, पण मालिका जिंकली

दरम्यान, पर्थला झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून रुदरफोर्डने 40 चेंडूत 67 धावा केल्या, तर रसेलने 29 चेंडूत 71 धावा ठोकल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 139 धावांची भागीदारीही केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने 20 षटकात 6 बाद 220 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून झेवियर बार्टलेटने 2 विकेट्स घेतल्या.

Fan grabs one-handed catch without spilling his drink
IND vs ENG: स्टोक्सच्या 100 व्या कसोटीसाठी प्लेइंग-11 जाहीर, कर्णधाराला विजयी भेट देण्यासाठी इंग्लिश संघ सज्ज

त्यानंतर 221 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 5 बाद 183 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने 81 धावांची खेळी केली. तसेच टीम डेव्हिडने 41 धावा केल्या.

वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्ड आणि रोस्टन चेस यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अकील हुसेनने 1 विकेट घेतली.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पर्थमधील सामना गमावला असला तरी या टी20 मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले असल्याने त्यांनी ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com