'थांबा, अपीलच केलं नाही...' रनआऊट असूनही नाबाद दिल्याने AUS vs WI सामन्यात राडा, वाचा काय सांगतात नियम

Appeal Rule in Cricket: ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघात रविवारी झालेल्या टी20 सामन्यात अल्झारी जोसेफ रनआऊट असतानाही ऑस्ट्रेलियाने अपील केले नसल्याचे सांगत पंचांनी त्याला नाबाद दिले होते.
West Indies vs Australia
West Indies vs AustraliaX/cricketcomau
Published on
Updated on

Australia denied a run out as Umpire says they did not appeal:

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघात रविवारी (11 फेब्रुवारी) टी20 मालिकेतील दुसरा सामना ऍडलेडला पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी विजय मिळवला. मात्र हा सामना एका घटनेमुळे बराच चर्चेत राहिला.

झाले असे की ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 242 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करत असताना वेस्ट इंडिजला अखेरच्या दोन षटकात 53 धावांची गरज होती.

यावेळी स्पेन्सर जॉन्सनने गोलंदाजी केलेल्या 19 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अल्झारी जोसेफने कव्हरला फटका मारला आणि जेसन होल्डरसह चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी मिचेल मार्शने चेंडू आडवला आणि गोलंदाजाच्या एन्डकडे फेकला.

त्यावेळी स्पेन्सरने चेंडू पकडून स्टंप उडवले. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून विकेटसाठी फारसा उत्साह दिसला नाही आणि स्पेन्सरही नंतर पुढचा चेंडू टाकण्याची तयारी करायला गेला.

West Indies vs Australia
Glenn Maxwell: 8 सिक्स अन् 12 फोर...! मॅक्सवेलने वादळी शतकासह केली रोहितच्या विश्वविक्रमाची बरोबरी

दरम्यान, त्याचवेळी मैदानावरील पंच गेराल्ड अबूद त्यांच्या रेडीओवर 'नो अपील' असे म्हणताना दिसले. त्यानंतर त्या चेंडूचा रिप्ले मोठ्या स्क्रिनवर मैदानात दाखवण्यात आला, त्यात जेव्हा स्पेन्सरने बेल्स उडवले, त्यावेळी जोसेफ क्रिजमध्ये पोहचला नसल्याचे दिसले. ते पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू विकेटचे सेलिब्रेशन करू लागले.

मात्र त्याचवेळी पंचांनी अल्झारी जोसेफला नाबाद घोषित केले, कारण ऑस्ट्रेलियाने या विकेटसाठी अपील केले नव्हते. यानंतर बराचवेळ चर्चा झाली. काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सांगितले की त्यांनी अपील केले होते.

पण पंच अबूद यांनी सर्वांना चर्चा थांबवून पुन्हा खेळ सुरू करण्याचा आदेश दिला. त्यामुळे जॉन्सन पुढचा चेंडू टाकण्यासाठी गेला. दरम्यान, जोसफेला मिळालेले हे जीवदान ऑस्ट्रेलियाला फार महागात पडले नाही, कारण वेस्ट इंडिज संघ 20 षटकात 9 बाद 207 धावाच करू शकले.

दरम्यान, या घटनेमुळे नक्की अपीलचा नियम आहे काय, याबद्दल चर्चेला उधाण आले. दरम्यान क्रिकेटचे नियम निश्चित करणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या नियमावलीत याबद्दलही माहिती देण्यात आली आहे. नियम क्रमांक 31 अपीलबाबत आहे.

West Indies vs Australia
IND vs ENG: इंग्लंडला 6 ऐवजी का मिळाल्या 5 धावा? काय आहे ओव्हरथ्रोवर चौकार गेल्यानंतरचा नियम, घ्या जाणून
Cricket Appeal Rule
Cricket Appeal Rule Screengrab: https://www.lords.org/

यातील 31.1 नियमात सांगण्यात आले आहे की फलंदाज जरी बाद असला, तरी जोपर्यंत क्षेत्ररक्षकांकडून विकेटसाठी अपील केले जात नाही, तोपर्यंत पंच त्या फलंदाजाला बाद देऊ शकत नाही. पण यामुळे जर फलंदाज नियमानुसार बाद असेल आणि मैदान सोडून जात असेल, तर त्याला आडवता येत नाही.'

त्याचबरोबर 31.3 नियमानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विकेटसाठी पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी किंवा पंचांकडून तो चेंडू पूर्ण झाल्यानंतर वेळ संपल्याचे घोषित होण्यापूर्वी अपील करण्याची परवानगी असते. तसेच 31.4 नियमानुसार “How’s That?” असे विचारत केलेल्या अपीलमध्ये सर्व गोष्टी सामाविष्ठ असतात.

Cricket Appeal Rule
Cricket Appeal RuleScreengrab: https://www.lords.org/

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी 31.7 नियमानुसार की जर फलंदाजाला बाद दिलेले नसतानाही, जर त्याने बाद असल्याच्या गैरसमजातून मैदान सोडले असेल, तर पंच पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी त्या फलंदाजाला परत बोलवू शकतात. जर ही विकेट अखेरची असेल, तर पंच मैदान सोडण्यापूर्वी त्या फलंदाजाला पुन्हा मैदानात बोलवू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com