Viral Video  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: गणपती बाप्पा मोरया... ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल!

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाला अखेर पहिला विजय मिळाला.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाला अखेर पहिला विजय मिळाला. सोमवारी ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर पाच गडी राखून विजय मिळवला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियासाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.

दरम्यान, ICC विश्वचषक 2023 मधील श्रीलंकाविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना 16 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल विहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पावसानेही अडथळा निर्माण केला, पण अखेरीस संपूर्ण सामना पूर्ण झाला.

पथुम निसांका आणि कुसल परेरा यांनी मिळून श्रीलंकेसाठी (Sri Lanka) पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी केली, पण यानंतर श्रीलंकेचा डाव पत्त्यासारखा कोसळला.

या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी खूप मजा केली. ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात नाचताना दिसत आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियासाठी (Australia) अॅडम झम्पाने आठ षटकांत 47 धावा देत चार बळी घेतले. निसांका 61 धावा करुन बाद झाला तर परेरा 78 धावा करुन बाद झाला.

या दोघांशिवाय, दुहेरी आकडा गाठणारा एकमेव श्रीलंकेचा फलंदाज चरिथ असलंका होता, ज्याने 25 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. एक विकेट ग्लेन मॅक्सवेलच्या खात्यात गेली.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवातही काही खास झाली नाही. ऑस्ट्रेलियाने 24 धावांत डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथच्या विकेट्स गमावल्या होत्या. वॉर्नर 11 धावा करुन बाद झाला तर स्मिथ खाते न उघडता बाद झाला.

मिचेल मार्शने 52 तर मार्नस लॅब्युशेनने 40 धावा केल्या. 210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 35.2 षटकात 5 विकेट गमावत 215 धावा करुन सामना जिंकला. जोश इंग्लिसने 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

याशिवाय, ग्लेन मॅक्सवेलने 21 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. या विजयासह ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे, तर श्रीलंका नवव्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT