Usama Mir  Dainik Gomantak
क्रीडा

Aus vs Pak: पदार्पण सामन्यातच उसामा मीरच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड, शाहीन आफ्रिदीला सोडले मागे!

ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा धुव्वा उडवला.

Manish Jadhav

ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा धुव्वा उडवला. सामन्यादरम्यान, हारिस रौफने 10.37 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. तर उसामा मीरने 9.11 च्या इकॉनॉमीसह धावा दिल्या.

एवढेच नाही तर पाकिस्तानचे इतर गोलंदाजही आज चांगलेच महागात पडले. मात्र, उसामा मीरच्या नावावर एक लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे. विश्वचषकात पदार्पण करताना सर्वाधिक धावा देणारा तो पाकिस्तानचा पहिला गोलंदाज ठरला आहे.

दरम्यान, उसामा मीरच्या आधी संघाचा सध्याचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या नावावर हा नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेला होता. विश्वचषक 2019 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या 10 षटकांच्या स्पेलमध्ये 70 धावा दिल्या होत्या.

मात्र, आजच्या सामन्यानंतर मीरने त्याला मागे सोडले आहे. विश्वचषकात पाकिस्तानकडून (Pakistan) पदार्पण करताना सर्वाधिक धावा देणारा तो पहिला पाकिस्तानी गोलंदाज ठरला आहे. मीरने आज कांगारु संघाविरुद्ध 10 षटके टाकली. यादरम्यान त्याने 82 धावा दिल्या.

विश्वचषकात पाकिस्तानकडून पदार्पण करताना सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज:

1/82 – 9 षटके – उसामा मीर – पाकिस्तान – विरुद्ध ऑस्ट्रेलिया – बंगळुरु – 2023

2/70 – 10 ओव्हर्स – शाहीन आफ्रिदी – पाकिस्तान – विरुद्ध ऑस्ट्रेलिया – टॉंटन – 2019

2/63 – 10 षटके – शादाब खान – पाकिस्तान – विरुद्ध इंग्लंड – नॉटिंगहॅम – 2019

1/63 – 12 ओव्हर्स – सरफराज नवाज – पाकिस्तान – विरुद्ध ऑस्ट्रेलिया – लीड्स – 1975

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मीरची गोलंदाजीची कामगिरी कशी होती:

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात उपकर्णधार शादाब खानच्या जागी मीरचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचाही विश्वचषकातील हा पहिलाच सामना आहे. त्याने आज कांगारु संघाविरुद्ध एकूण 10 षटके टाकली.

दरम्यान, त्याने 9.11 च्या इकॉनॉमीमध्ये 82 धावा देताना एक विकेट मिळवण्यात यश मिळवले. त्याचा बळी स्टीव्ह स्मिथ ठरला.

शाहीन आफ्रिदीची विशेष कामगिरी:

शाहीन आफ्रिदी विश्वचषक स्पर्धेत पाच विकेट्स मिळवण्याच्या बाबतीत पाकिस्तानसाठी संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. त्याने आपला सासरा शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT