ILS Football | Dimitri Petratos Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: एटीके मोहन बागानचा पलटवार; एफसी गोवा संघावर 2-1 ने विजय

पहिल्या टप्प्यातील पराभवाची परतफेड

Akshay Nirmale

Indian Super League Football: एटीके मोहन बागानने बुधवारी घरच्या मैदानावर पलटवार केला. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्यांना एफसी गोवाने तीन गोलने हरविले होते, त्या पराभवाची परतफेड करताना हुआन फेर्रांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने 2-1 असा विजय प्राप्त केला. आणखी संधीचे सोने केले असते तर त्यांना गोलफरक एकतर्फी ठरविला आला असता.

(FC Goa vs ATK Mohun Bagan)

कोलकात्यातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर पूर्वार्धात दोन्ही संघ 1-1 असे गोलबरोबरीत होते. ऑस्ट्रेलियन आघाडीपटू दिमित्री पेट्राटोस याने प्रेक्षणीय गोलसह नवव्याच मिनिटास यजमान संघाला आघाडी मिळवून दिली. थ्रो-ईनवरील लिस्टन कुलासोच्या असिस्टवर त्याने वेगवान मुसंडी मारत गोल केला. एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज मोईरांगथेम याने किंचित जागा सोडल्याचाही त्याला फायदा झाला.

25 व्या मिनिटास एफसी गोवाने बरोबरी साधली. एदू बेदियाच्या फ्रीकिवर बचावपटू अन्वर अली याने चाणाक्षपणे चेंडूवर पाय लावत प्रतिस्पर्धी गोलरक्षक विशाल कैथ याला चकविले. 52 व्या मिनिटास ह्युगो बोमोस याच्या गोलमुळे एटीके मोहन बागानला पुन्हा आघाडी मिळाली. एफसी गोवाच्या बचावफळींचा त्रुटींचा लाभ उठवताना बोमोस याच्यासमवेत छान समन्वय साधत दिमित्री पेट्राटोस याने सुरेख असिस्ट पुरविले.

उत्तरार्धातील खेळात दिमित्री, तसेच आशिक कुरुनियान यांनी गोल करण्याच्या सोप्या संधी दवडल्या, त्यामुळे मोहन बागानची आघाडी वाढली नाही. सामन्यातील 15 मिनिटे बाकी असताना अन्वरी अलीच्या प्रयत्नावर चेंडू गोलपोस्टला आपटल्यामुळे एफसी गोवास बरोबरी साधता आली नाही.

एटीके मोहन बागान तिसऱ्या स्थानी

मागील लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडकडून धक्कादायक पराभव पत्करलेल्या एटीके मोहन बागानने स्पर्धेतील सातव्या विजयासह गुणतक्त्यात तिसरा क्रमांक मिळविला. त्यांचे आता 12 लढतीनंतर 23 गुण झाले आहेत. दोन पराभव आणि एका बरोबरीनंतर एफसी गोवाला पराभूत व्हावे लागले. त्यांचा हा 12 लढतीतील पाचवा पराभव ठरला. त्यामुळे 19 गुणांसह ते पाचव्या स्थानी कायम राहिले.

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवाविरुद्ध 6 लढतीत एटीके मोहन बागानचे 4 विजय

- एटीके मोहन बागानच्या दिमित्री पेट्राटोस याचे 11 लढतीत 5 गोल व 6 असिस्ट

- यंदाच्या आयएसएलमध्ये ह्युगो बोमोस याचे 4 गोल

- एफसी गोवाचा बचावपटू अन्वर अली याचा पहिलाच आयएसएल गोल

- स्पर्धेत एटीके मोहन बागनाचा गोलफरक 17-12, तर एफसी गोवाचा 20-16

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT