India Vs Pakistan  Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2023: हॉकीमध्येही भारताची बादशाहत कायम, पाकिस्तानचा 8 गोलने पराभव

Asian Games 2023: हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानचा 10-2 असा पराभव केला.

Manish Jadhav

Asian Games 2023: हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानचा 10-2 असा पराभव केला. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग चौथा विजय मिळवला. यासह भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे.

सामन्याच्या चारही क्वार्टरसह, भारतीय संघाने एकूण 10 गोल केले, तर पाकिस्तानला केवळ 2 गोल करता आले. हा सामना आज म्हणजेच शनिवारी हांगझू येथील गोंगशु कॅनाल स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला.

सुपरस्टार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला. यापूर्वी, भारताने जपानला पराभूत केले होते, त्यानंतर टीम अ गटात पाकिस्तानला मागे टाकण्यात यशस्वी ठरला आहे.

भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले

पहिल्या क्वार्टरमध्ये आठव्या मिनिटालाच भारताने पहिला गोल केला. मनदीप सिंगने गोल करत टीम इंडियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर 11व्या मिनिटाला पाकिस्तानी गोलकीपरच्या फाऊलमुळे भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला.

यावर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत भारतीय संघाला 2-0 ने आघाडीवर नेले. भारतीय संघाने पहिल्या क्वार्टरमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली होती.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने 4-0 अशी आघाडी घेतली

दुसऱ्या क्वार्टरच्या 17व्या मिनिटाला भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह अप्रतिम गोल केला आणि टीम इंडियाची आघाडी 3-0 अशी वाढवली.

यानंतर 30व्या मिनिटाला म्हणजेच दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणी सुमित, ललित आणि गुरजंत यांच्या जुगलबंदीने भारताने चौथा गोल केला. मध्यंतरापर्यंत भारताने (India) पाकिस्तानवर 4-0 अशी आघाडी घेतली होती.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला

तिसऱ्या क्वार्टरच्या 33व्या मिनिटाला पाकिस्तानने केलेल्या फाऊलवर भारताला आणखी एक पेनल्टी स्ट्रोक मिळाला. यावर कर्णधार हरमनप्रीतने गोलची हॅट्ट्रिक पूर्ण केली. यानंतर 34व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह चौथा गोल केला.

38व्या मिनिटाला पाकिस्तानच्या सुफियान मोहम्मदने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकसह अप्रतिम गोल केला. या सामन्यातील पाकिस्तानचा हा पहिला गोल ठरला. यानंतर 41व्या मिनिटाला सुखजीतच्या पासवर भारताच्या वरुण कुमारने शानदार गोल करत भारताची आघाडी 7-1 अशी घेतली.

यानंतर तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणी पाकिस्तानच्या (Pakistan) अब्दुलने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पाकिस्तानवर 7-2 अशी आघाडी घेतली होती.

चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने तीन गोल केले

चौथ्या क्वार्टरच्या 46व्या मिनिटाला भारताच्या समशेरने अप्रतिम मैदानी गोल केला. या सामन्यातील भारताचा हा आठवा गोल ठरला. यानंतर 49व्या मिनिटाला जर्मनप्रीत सिंगकडून ललित उपाध्यायने गोल करुन भारताची आघाडी 9-2 अशी घेतली.

53व्या मिनिटाला वरुणने सामन्यातील आपला दुसरा आणि भारताचा 10वा गोल केला. अशा प्रकारे टीम इंडियाने पाकिस्तानचा 10-2 असा पराभव केला.

टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे

एशियाडमध्‍ये भारताची कामगिरी उत्‍कृष्‍ट राहिली असून, पूल-अ मध्‍ये आतापर्यंत चारही सामने जिंकले आहेत.

त्याचवेळी, पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पूल लेगमध्ये तिन्ही सामने जिंकले होते. भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यांनी त्यांच्या पूल-अ सामन्यात उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव केला होता.

यानंतर हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने सिंगापूरचा 16-1 असा पराभव करत सलग दुसरा विजय संपादन केला होता. त्यानंतर टीम इंडियाने 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या जपानचा 4-2 असा पराभव करुन विजयाची हॅट्ट्रिक साधली होती.

आता भारताने पाकिस्तानला हरवून विजय संपादन केला आहे. त्याचवेळी, पूल अ च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने सिंगापूरचा 11-0, बांगलादेशचा 5-2 आणि उझबेकिस्तानचा 18-2 असा पराभव केला होता. भारताविरुद्ध 10-2 असा पराभव पत्करावा लागला.

भारत-पाकिस्तान आमनेसामने

या एशियाड सामन्यापूर्वी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना यावर्षी ऑगस्टमध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पूल सामन्यादरम्यान झाला होता. भारतीय संघाने हा सामना 4-0 असा जिंकला होता.

2013 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात 25 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने या कालावधीत 17 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने पाच सामने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले. दोन्ही देशांदरम्यान एकूण 180 सामने खेळले गेले आहेत.

यापैकी टीम इंडियाने 66 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 82 सामने जिंकले आहेत. 32 सामने अनिर्णित राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT