India vs Pakistan | Asia Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023 पाकिस्तानमधून हलवणार? 'हा' देश करू शकतो आयोजन

आशिया चषक 2023 स्पर्धेचे आयोजन गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असून आता पाकिस्तानमधून ही स्पर्धा हलवली जाऊ शकते.

Pranali Kodre

Sri Lanka is likely to host Asia Cup 2023: आशिया चषक यावर्षी सप्टेंबरमध्ये होणार आहे. पण या स्पर्धेचे आयोजन गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे.

पण सुरक्षेच्या कारणात्सव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

त्यानंतर पाकिस्तानमध्ये या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहे. आता असे समजत आहे की एसीसी पाकिस्तानमधून ही स्पर्धा हलवून श्रीलंकेत आयोजित केली जाऊ शकते.

बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तान या दोन संघात असलेल्या राजकिय तणावामुळे आणि सुरक्षेचे कारण सांगत पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यावर एक प्रस्ताव दिला होता की भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये न खेळता तटस्थ ठिकाणी सामने खेळावे. तर अन्य संघांचे सामने पाकिस्तानमध्ये होतील.

पण हा प्रस्ताव कोणी स्विकारला नसल्याचे आणि स्पर्धेच्या ब्रॉडकास्टरनेही याबद्दल चिंता व्यक्त केली असल्याचे काही रिपोर्ट्समधून समोर आले आहे. त्यातच ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे त्यावेळी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) प्रचंड गरमी असते. त्यामुळे खेळाडूंना इतक्या गरमीत खेळणे सोपे असणार नाही. त्यातच आगामी वर्ल्डकपचा विचार करता हे सोपे नाही.

त्याचमुळे आता ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवली जाण्याची दाट शक्यता आहे. याबद्दल या महिन्याच्या अखेरीपर्यंत निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच श्रीलंकेत स्पर्धा होण्यासाठी श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांकडूनही समर्थन मिळण्याची दाट शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी भारताचे सामने तटस्थ ठिकाणी आणि अन्य सामने पाकिस्तानात खेळवण्याच्या प्रस्तावाला समर्थन मिळवण्यासाठी दुबईला गेले होते. पण त्यांच्या या प्रस्तावाला समर्थन मिळालेले नाही. श्रीलंका आणि बांगलादेश या संघांनाही बीसीसीआयची साथ दिली आहे.

दरम्यान, आता एसीसी अध्यक्ष जय शाह यांना अंतिम निर्णय घेण्यासाठी अधिकृत कार्यकारी बैठक घ्यावी लागणार आहे. तसेच जर संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमधून बाहेर गेली, तर पाकिस्तान या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचीही शक्यताही वर्तवली जात आहे.

तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या वर्ल्डकपसाठीही पाकिस्तान भारतात येण्यासाठी नकार देण्याची शक्यता आहे. पण आता यावर अंतिम निर्णय काय होणार हे पाहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT