Asian Championship  Dainik Gomantak
क्रीडा

Asian Championship : आशियाई स्पर्धेत गोमंतकीयांचे यश; पाच ॲथलीट्सचा सहभाग

Asian Championship : पाच सुवर्ण, एक रौप्य, तीन ब्राँझसह नऊ पदके

गोमन्तक डिजिटल टीम

Asian Championship : मये, फिलिपिन्समध्ये झालेल्या २२व्या आशियाई मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत गोमंतकीय ॲथलीट्सनी यशस्वी कामगिरी बजावली. अनिता रॉड्रिग्ज, रामनाथ देसाई, वृंदा वेरेकर, अल्जिरा लाकेर्डा व उर्मिला साळगावकर या राज्यातील ॲथलीट्सनी स्पर्धेत भाग घेतला.

गोव्याच्या खेळाडूंनी एकत्रित नऊ पदके जिंकली. यामध्ये पाच सुवर्ण, एक रौप्य व तीन ब्राँझपदकांची कमाई केली.

कोलकाता येथील झालेल्या अखिल भारतीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे गोमंतकीय खेळाडूंची फिलिपिन्समधील स्पर्धेसाठी निवड झाली.

तेथील न्यू क्लार्क सिटी येथे झालेल्या स्पर्धेत गोव्याच्या अल्जिरा लाकेर्डा हिने दोन सुवर्ण व एक ब्राँझपदक जिंकले. तिला ४ बाय ४०० मीटर व ४ बाय १०० मीटर रिलेत सुवर्ण, तर ४०० मीटर शर्यतीत ब्राँझपदक मिळाले.

रामनाथ देसाईने एक सुवर्ण, एक रौप्य व दोन ब्राँझपदके पटकावली. त्याला ४ बाय ४०० मीटर रिलेत सुवर्ण, १०० मीटर शर्यतीत रौप्य, तर २०० मीटर व ४०० मीटर शर्यतीत ब्राँझपदक मिळाले. उर्मिला साळगावकर हिने ८० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्ण, तर वृंदा वेरेकरने भालाफेकीत सुवर्णपदक प्राप्त केले.

भारत अव्वल स्थानी

आशियाई मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला अव्वल स्थान मिळाले. त्यांनी ७० सुवर्ण, ६३ रौप्य व ८२ ब्राँझपदकांसह एकूण २१५ पदके जिंकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

Vaibhav Suryavanshi: LIVE सामन्यात वाद! आऊट दिल्यावर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अंपायरवर भडकला; पुढे काय झालं, पाहा VIDEO

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

SCROLL FOR NEXT