Hockey India Dainik Gomantak
क्रीडा

Asian Champions Trophy: भारत-पाकिस्तान 'या' दिवशी येणार आमने-सामने! पाहा वेळापत्रक

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 हॉकी स्पर्धेचे वेळापत्रक घोषित झाले असून भारत-पाकिस्तान संघही आमने-सामने येणार आहेत.

Pranali Kodre

Asian Champions Trophy Hockey Tournament Schedule announced: भारतात यावर्षी हिरो एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 ही हॉकी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. चेन्नईमध्ये ही स्पर्धा 3 ते 12 ऑगस्टदरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच आशियाई हॉकी महासंघाने घोषित केले आहे.

या स्पर्धेतील पहिला सामना कोरिया आणि जपान यांच्यात खेळला जाईल. तसेच पहिल्याच दिवशीच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ चीनविरुद्ध मैदानात उतरेल. हा सामना महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर होणार आहे.

या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारतीय संघासह कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, जपान आणि चीन या संघांचा समावेश आहे. हे सर्व संघ साखळी फेरीत खेळणार आहेत.

साल 2021 मध्ये पार पडलेल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दक्षिण कोरियाने विजेतेपद जिंकले होते. तसेच आत्तापर्यंत भारताने 2011, 2016 आणि 2018 या तीन वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली आहे. याशिवाय पाकिस्तानने 2012, 2013 आणि 2018 या तीन वर्षी विजेतपद मिळवले. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान

दरम्यान, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धीही आमने-सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान संघात 9 ऑगस्टला सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 8.30 वाजता सुरुवात होणार आहे. हा भारताचा अखेरचा साखळी सामना असणार आहे.

भारताचे सामने

भारतीय संघ साखळी फेरीत चीननंतर 4 ऑगस्टला जपानविरुद्ध, 6 ऑगस्टला मलेशियाविरुद्ध खेळणार आहे. तसेच 7 ऑगस्ट रोजी कोरियाशी भारताची लढत होणार आहे.

असे आहे भारताचे वेळापत्रक

  • 3 ऑगस्ट - भारत विरुद्ध चीन (वेळ - रात्री 8.30 वा.)

  • 4 ऑगस्ट - भारत विरुद्ध जपान (वेळ - रात्री 8.30 वा.)

  • 6 ऑगस्ट - भारत विरुद्ध मलेशिया (वेळ - रात्री 8.30 वा.)

  • 7 ऑगस्ट - भारत विरुद्ध कोरिया (वेळ - रात्री 8.30 वा.)

  • 9 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान (वेळ - रात्री 8.30 वा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोंयत कोळसो नाका' आंदोलनाला विरोधी पक्षांची एकजूट! आलेमाव, सरदेसाई अन् परबांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, 'कोळशाच्या मुद्यावर गप्प बसणारे आता...'

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

SCROLL FOR NEXT