India Hockey Team Dainik Gomantak
क्रीडा

Asian Champions Trophy Hockey: भारताच्या मोहिमेला दणदणीत विजयानं सुरुवात; पहिल्याच सामन्यात चीनला चारली धूळ

Indian Hockey Team: आशिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात चीनविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे.

Pranali Kodre

Asian Champions Trophy 2023: Indian Hockey Team beat China 7-2:

भारतीय हॉकी संघाने आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेत आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली आहे.

आपल्या पहिल्याच सामन्यात भारताने चीनविरुद्ध 7-2 अशा गोलफरकाने विजय मिळवला आहे.

चेन्नईतील मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंग (5', 8'), वरूण कुमार (19', 30'), सुखजीत सिंग (15'), आकाशदीप सिंग (16') आणि मनदीप सिंग (40') यांनी गोल केले. विशेष म्हणजे मनदीपचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय गोल देखील ठरला.

भारताने या सामन्यात शानदार सुरुवात करताना पहिल्याच क्वार्टरमध्ये 3 गोल नोंदवले होते. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताचे आक्रमण चीनच्या बचावाला भारी पडले.

भारताकडून हरमनप्रीतने 5 व्या आणि 8 व्या मिनिटालाच गोल नोंदवत सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 15 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर चीनकडून हरमनप्रीतने मारलला चेंडू रोखला, पण सुखजीतने रिबाऊंडवर गोल नोंदवला.

दरम्यान भारताकडून आकाशदीपने 16 व्या मिनिटालाच गोल नोंदवून दुसऱ्या क्वार्टरला चांगली सुरुवात करून दिली होती. पण दुसऱ्या क्वार्टरमध्ये चीनने चांगला खेळ केला.

चीनकडून वेनहुई इ याने 18 व्या मिनिटाला आणि जेइशेंग गावोने 25 व्या मिनिटाला गोल केला. पण यानंतर चीनला गोल करता आले नाहीत. तसेच दुसऱ्या क्वार्टरच्या 19 व्या मिनिटाला आणि अखेरच्या मिनिटात वरुणने भारतासाठी पाचवा आणि सहावा गोल नोंदवला.

चीनने तिसऱ्या क्वार्टरमध्ये चांगला बचाव केला होता. त्यांनी तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या 10 मिनिटात भारताला गोल करू दिले नाही. पण सामन्याच्या 40 व्या मिनिटाला मनदीपने पेनल्टी कॉर्नरवर भारतासाठी 7वा आणि आपला 100 वा गोल नोंदवला.

चौथ्या क्वार्टरमध्ये मात्र चीनने भारताला आणखी गोल करू दिला नाही. त्यामुळे सामना 7-2 असा संपला.

आता भारताचा दुसरा सामना लगेचच 4 ऑगस्ट रोजी जपानविरुद्ध रात्री 8.30 वाजता चालू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

SCROLL FOR NEXT