Tilak Verma Dainik Gomantak
क्रीडा

राड्याचीच चर्चा..! IND vs PAK सामन्यातील 'त्या' 5 प्रसंगांनी वाढवलं मैदानावरचं तापमान; हर्षित राणाला घेरणाऱ्या पाकड्यांशी भिडला टीम इंडियाचा कॅप्टन Watch Video

IND A vs PAK A Controversies 2026: आशिया चषक रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये रंगलेला महामुकाबला खेळापेक्षा मैदानावरील वादांमुळे अधिक गाजला.

Manish Jadhav

IND A vs PAK A Controversies 2026: आशिया चषक रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये रंगलेला महामुकाबला खेळापेक्षा मैदानावरील वादांमुळे अधिक गाजला. या अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानने 48 धावांनी बाजी मारली असली, तरी संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये झालेली शाब्दिक चकमक आणि तणाव चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. विशेषतः वेगवान गोलंदाज हर्षित राणा या सामन्यात 'अँग्री यंग मॅन'च्या भूमिकेत दिसला आणि बहुतांश वाद त्याच्याच भोवती फिरताना पाहायला मिळाले.

या हाय-व्होल्टेज सामन्यात घडलेले 5 वाद

सलामीवीरांशी थेट पंगा: पाकिस्तानच्या डावाची सुरुवात दमदार झाली होती. सलामीवीर शामिल हुसैन आक्रमक फलंदाजी करत असताना गोलंदाज हर्षित राणा आणि त्याच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर दुसरा सलामीवीर माज सदाकत याच्याशीही हर्षितची खडाजंगी झाली.

आक्रमक 'सेंड-ऑफ': वादाची ही ठिणगी इथेच थांबली नाही. शामिल हुसैनचा झेल पकडल्यानंतर हर्षित राणाने त्याला अत्यंत आक्रमक आणि जशास तसे प्रत्युत्तर देणारा 'सेंड-ऑफ' दिला, ज्यामुळे मैदानावरील वातावरण अधिकच तापले.

'डेड बॉल'चा वाद आणि पंचांशी हुज्जत: सामन्यादरम्यान पाकिस्तानी गोलंदाज अली रजा 'राउंड द विकेट' गोलंदाजी करत असताना, नॉन-स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या तिलक वर्मामुळे पंचांनी तो चेंडू 'डेड बॉल' घोषित केला. या निर्णयावर नाराज झालेल्या पाकिस्तानी खेळाडूंनी थेट पंचांशीच हुज्जत घातली.

तिलक वर्मा आणि अब्दुल समद यांच्यात जुंपली: 'डेड बॉल'च्या निर्णयावरुन सुरु झालेला तणाव खेळाडूंमध्येही पसरला. या प्रसंगी तिलक आणि अब्दुल समद यांच्यात मैदानातच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

हर्षितच्या विकेटनंतर राडा आणि तिलकची एन्ट्री: सामन्यातील सर्वात नाट्यमय क्षण हर्षित राणा बाद झाल्यावर आला. पाकिस्तानी खेळाडूंनी एकत्र येत हर्षितला डिवचत 'सेंड-ऑफ' दिला. आपल्या सहकाऱ्याची ही कोंडी पाहून तिलक वर्मा मैदानातच पाकिस्तानी खेळाडूंशी भिडला. एकूणच, क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तान (Pakistan) सामन्यातील पारंपरिक ईर्ष्या आणि तणावाचा उच्चांक या सामन्यात अनुभवायला मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sindhudurg News: बेकायदेशीर दारू विक्रीचा पर्दाफाश! मालवणमध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त, एकावर कारवाई

Indian Super League: चर्चिल ब्रदर्सची अखेरपर्यंत कडवी झुंज, पण मोहन बागानचा 2-1 ने विजय; गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप

Goa Politics: सासष्टीत काँग्रेससमोर बंडखोरांचे आव्हान! आघाडीशिवाय पर्याय नाही; नावेली, बाणावली, नुवेत आव्हान अधिक कठीण

PM Modi Speech: सत्तेतील अधिकार, नोकरशाहीचा प्रभाव आणि उद्योगांची अगतिकता; मोदींच्या कानउघाडणीनंतर अर्थविश्वात खळबळ

VIDEO: ऑनलाइन रिटर्नच्या नावाखाली मोठा घोटाळा? 550 बॉक्स उघडताच व्यापाऱ्याला धक्का, नव्या शूजऐवजी मिळाले जुने आणि फाटलेले बूट!

SCROLL FOR NEXT