India vs Sri Lanka Final Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL Final: श्रीलंकेने जिंकला 'टॉस', विराट-बुमराहसह 'या' 5 खेळाडूंचे टीम इंडियात पुनरागमन; पाहा प्लेइंग-11

Asia Cup 2023: भारत विरुद्ध श्रीलंका संघात आशिया चषकाचा अंतिम सामना रविवारी होत असून श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आहे.

Pranali Kodre

Asia Cup Final 2023 India vs Sri Lanka Playing XI :

आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (17 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. श्रीलंकेतील कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हन विराट कोहली, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन झाले आहे. तसेच अक्षर पटेल दुखापत झाल्याने तो या सामन्यातून बाहेर झाला असून त्याच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

अक्षरला बांगलादेश विरुद्ध सुपर फोरच्या सामन्यात फलंदाजी करताना हाताला चेंडू लागला होता. त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्याचबरोबर बांगलादेशविरुद्ध भारताकडून खेळलेले तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर हे अंतिम सामन्यातून बाहेर झाले आहेत.

श्रीलंकेने प्लेइंग इलेव्हन महिश तिक्षणा ऐवजी दुशन हेमंताला संधी दिली आहे. तिक्षणा दुखापतग्रस्त आहे. या व्यतिरिक्त बदल झालेला नाही.

राखीव दिवसाची सोय

या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण असे असले तरी राखीव दिवसाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हा सामना रविवारी पूर्ण झाला नाही, तर सोमवारी राखीव दिवशी खेळवला जाणार आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

  • श्रीलंका - पाथम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका(कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

SCROLL FOR NEXT