Asia Cup 2023 Final: आशिया कप फायनलसाठी अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11, श्रीलंकेला टक्कर देण्यासाठी...

India vs Sri Lanka: अशा परिस्थितीत अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India's Predicted Playing XI For Asia Cup Final 2023: आशिया कप 2023 चा अंतिम सामना (रविवार) 17 सप्टेंबर रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना भारत आणि श्रीलंका संघांमध्ये होणार आहे.

आपल्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करुन श्रीलंकेने अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले.

त्याचवेळी, टीम इंडियाला शेवटच्या सामन्यात बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील.

फायनलसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11

फायनलपूर्वी टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशा परिस्थितीत अंतिम फेरीसाठी विश्रांती देण्यात आलेल्या सर्व खेळाडूंचे पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे.

विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या हे खेळाडू आहेत. कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिल ओपनिंग करु शकतो. तिसऱ्या क्रमांकासाठी विराट कोहलीचा संघात समावेश असेल.

तर मुख्य यष्टिरक्षक म्हणून संघात सामील झालेला केएल राहुल चौथ्या क्रमांकावर दिसू शकतो. याशिवाय, डावखुरा इशान किशन (Ishan Kishan) पाचव्या क्रमांकाची जबाबदारी सांभाळू शकतो. इशान आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.

याशिवाय, अष्टपैलू हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर तर रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

Team India
Emerging Teams Asia Cup 2023 Final: पाकिस्तानने टीम इंडियाला दिले 353 धावांचे टार्गेट, तय्यब ताहिरने ठोकले शानदार 'शतक'

गोलंदाजीत बदल होणार

फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या स्पर्धेत आतापर्यंत यशस्वी ठरला आहे. अशा परिस्थितीत त्याचे पुनरागमनही निश्चित आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हेही वेगवान गोलंदाज म्हणून खेळतील याची खात्री आहे. संघाची फलंदाजी आणखी मजबूत करण्यासाठी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

त्याचवेळी, श्रीलंका भारताविरुद्ध एका बदलासह अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरु शकते. श्रीलंकेचा फिरकीपटू महिश तीक्षणा जखमी झाला आहे. अशा स्थितीत श्रीलंकेला प्लेइंग 11 मध्ये किमान एक बदल करावा लागेल.

Team India
Asia Cup 2022 Final: सोशल मीडियावर पाकिस्तानच्या पराभवाचे सेलिब्रेशन, मीम्सचा पडतोय पाउस

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com