India vs Pakistan | Asia Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

ठरलं तर! Asia Cup पाकिस्तानात होणार; टीम इंडियाही खेळणार, पण...

आशिया चषक 2023 स्पर्धा पाकिस्तानच आयोजित करणार असल्याचे समोर येत आहे.

Pranali Kodre

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 स्पर्धेच्या आयोजनावरून आणि ठिकाणावरून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, भारतीय क्रिकेट संघ सुरक्षेच्या कारणाने पाकिस्तानला जाणार नसल्याचे बीसीसीआयने यापूर्वी स्पष्ट केले होते. त्याचमुळे या स्पर्धेच्या आयोजनावरून बराच गोंधळ झालेला होता,

पण आता आशिया चषकाच्या आयोजनाबद्दल सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न झाल्याचा समजत आहे. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार आशिया चषक 2023 स्पर्धा पाकिस्तानातच खेळवली जाऊ शकते, पण भारतीय संघाच्या सामन्यांसाठी श्रीलंकेची निवड करण्यात येईल.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव मांडला होता, जो आशियाई क्रिकेट परिषदेकडून स्विकारला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारताचे ४ ते ५ सामने श्रीलंकेत खेळवले जाऊ शकतात. तसेच उर्वरित सामने पाकिस्तानात खेळवले जाऊ शकतात.

दरम्यान भारत जर अंतिम सामन्यात पोहचला, तर अंतिम सामनही पाकिस्तानात खेळवला जाईल. याबद्दल अंतिम घोषणा येत्या दोन दिवसात करण्यात येऊ शकते. तसेच 1 ते 17 सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते. त्याचबरोबर पाकिस्तानमधील सामने लाहोरला खेळवले जाऊ शकतात.

दरम्यान, आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान हे संघ एकाच गटात आहेत. त्यांच्यासह पात्रता फेरीतून पात्र ठरलेला नेपाळ संघ खेळेल, तर दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत.

आशिया चषकात या सहा संघांमध्ये दोन गटांमध्ये सुपर सिक्सची फेरी खेळवली जाईल, त्यातून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. सुपर फोर फेरीत चार संघात साखळी फेरी खेळवली जाईल, यातून अव्वल दोन संघ अंतिम सामना खेळणार आहेत. म्हणजेच एकूण 13 सामने 13 दिवसांच्या कालावधीत खेळवण्यात येणार आहेत.

दरम्यान, या स्पर्धेची संरचना पाहाता भारत आणि पाकिस्तान हे चांगला खेळ करत पुढे जात राहिले, तर एकून तीनवेळा आमने-सामने येऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT