WTC 2023 Final: जड्डूनं केला गेम! ग्रीनचा झाला कॉमेडी सीन...Video पाहून तुम्हीही...

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये दुसऱ्या डावात जडेजाने ग्रीनला फिरकीच्या जाळ्यात अडकवत गमतीशीर पद्धतीने बाद केले.
Ravindra Jadeja | Cameron Green
Ravindra Jadeja | Cameron GreenDainik Gomantak
Published on
Updated on

Ravindra Jadeja clean Bowled Cameron Green: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या द ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला आहे. दरम्यान, या डावात रविंद्र जडेजाने कॅमेरॉन ग्रीनला अप्रतिमरित्या फिरकीच्या जाळ्यात अडकवं. त्याने घेतलेल्या या विकेटचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

या सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 44 षटकांपासून 4 बाद 123 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्युशेनने ४१ धावांपासून आणि कॅमेरॉन ग्रीनने 7 धावांपासून खेळायला सुरुवात केली. लॅब्युशेनने चौथ्या दिवशी सुरुवातीलाच विकेट गमावली.

Ravindra Jadeja | Cameron Green
WTC 2023 Final Weather Updates: पाऊस करणार का भारत-ऑस्ट्रेलियाचा गेम? असे आहेत चौथ्या दिवसाचे हवामान अंदाज

पण त्यानंतर ग्रीन आणि ऍलेक्स कॅरी यांनी डाव सावरला होता. त्यांची भागीदारीही रंगत होती. पण त्याचवेळी 63 व्या षटकात जडेजा गोलंदाजीला उतरला आणि त्याने ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने या षटकातील अखेरचा चेंडू आऊटसाईड लेगला टाकला.

त्यावेळी ग्रीनने तो चेंडू सोडण्याचा विचार केलेला, पण चेंडू टप्पा पडल्यानंतर फिरला आणि ग्रीनच्या ग्लव्ह्ज आणि पॅडला लागून थेट स्टंपवर आदळला. चेंडू ज्याप्रकारे स्टंपवर आदळला, ते पाहून ग्रीनही चकीत झाला होता. त्याच्या विकेटचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Ravindra Jadeja | Cameron Green
WTC 2023 Final: रहाणे-शार्दुलच्या झुंजीनंतर फॉलोऑन टळला, तरी 173 धावांची पिछाडी! पाहा भारताच्या सर्व विकेट्स

ग्रीन 25 धावांवर बाद झाला. जडेजाची ही दुसऱ्या डावातील तिसरी विकेट ठरली. पण त्यानंतरही मिचेल स्टार्कने कॅरीची चांगली साथ दिली. त्यांनी चौथ्या दिवसाचे पहिले सत्र संपेपर्यंत आणखी विकेट पडू दिल्या नाही.

पहिले सत्र संपले, तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 70 षटकात 6 बाद 201 धावा केल्या आहेत. कॅरी 41 धावांवर आणि स्टार्क 11 धावांवर नाबाद आहे. तसेच ऑस्ट्रेलिया पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीमुळे 374 धावांनी पुढे आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 296 धावांवर सर्वबाद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com