Team India Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: आशिया कपसाठी रवी शास्त्रींनी निवडली बेस्ट ऑफ द बेस्ट टीम इंडिया, 'या' मॅच विनर्सला...

Team India: आशिया कप 2023 पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या यजमानपदी 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाईल. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत.

Manish Jadhav

Asia Cup 2023: भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एकापेक्षा जास्त दिग्गज खेळाडूंची निवड करुन आशिया कप 2023 साठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रवी शास्त्री यांनी आशिया कपसाठी निवडलेल्या संघातून सर्वात मोठ्या दोन मॅच विनर्सना वगळले आहे.

आशिया कप 2023 पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या यजमानपदी 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाईल. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत.

रवी शास्त्री यांनी आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड केली

आशिया कपमध्ये भारताव्यतिरिक्त (India) पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळचा संघ सहभागी होणार आहे. आतापर्यंत 15 सीजनमध्ये भारताने सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे.

भारतानंतर सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेने 6 वेळा जेतेपदावर कब्जा केला आहे. या वर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या एकदिवसीय विश्वचषकामुळे, आशिया कप 2023 देखील वनडे फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल.

रवी शास्त्री यांनी एकापेक्षा जास्त दिग्गज खेळाडूंची निवड करुन आशिया कप 2023 साठी भारताचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

भारताच्या या दोन मोठ्या मॅच विनर्संना दाखवला बाहेरचा रस्ता

दरम्यान, शास्त्री यांनी शुभमन गिल, इशान किशन आणि रोहित शर्मा यांची एशिया कप 2023 संघात सलामीवीर म्हणून निवड केली आहे. रवी शास्त्री यांनी विराट कोहली, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची आशिया कप 2023 संघात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून निवड केली आहे.

शास्त्री यांनी संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इशान किशनची देखील निवड केली आहे. रवी शास्त्री यांनी टीम इंडियात अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या (Hardik Pandya), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांना स्थान दिले आहे.

मात्र शास्त्रींनी निवडलेल्या टीम इंडियामध्ये केएल राहुल आणि श्रेयस अय्यरला स्थान मिळालेले नाही.

आशिया कपसाठी रवी शास्त्रींची टीम इंडिया

शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT