Asia Cup 2023: आशिया चषक 2023 सुरु होण्यासाठी काही तास उरले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना बुधवारी (30 ऑगस्ट) यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे.
मुलतान क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील. या सामन्यासाठी पाकिस्तानने मंगळवारी रात्रीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. पाकिस्तानने प्लेइंग इलेव्हनमध्ये फलंदाज सौद शकील आणि गोलंदाज उसामा मीरला वगळले आहे.
दरम्यान, पाकिस्तान (Pakistan) आपल्या पहिल्या सामन्यात शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि नसीम शाह या त्यांच्या घातक वेगवान त्रिकुटासह उतरेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये शाहीनने चार तर रौफने पाच बळी घेतले होते.
त्याचवेळी, नसीमने दोन विकेट्स घेतल्या होत्या. नसीमने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 10 धावा करत पाकिस्तानला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता.
पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत अफगाणिस्तानचा पराभव करत पहिल्या क्रमांकाच्या वनडे संघाचा मुकुट पटकावला.
नेपाळविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग-11: फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह हरिस रौफ.
दुसरीकडे, नेपाळचा संघ प्रथमच आशिया कपमध्ये सहभागी होत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने प्रतिस्पर्धी संघाला हलक्यात घेणार नसल्याचे म्हटले आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध श्रीलंकेत झालेल्या मालिकेप्रमाणेच आम्ही विजयाची मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करु, असे नेपाळविरुद्धच्या (Nepal) सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बाबर म्हणाला.
बाबर पुढे म्हणाला की, सध्याचा पाकिस्तान संघ शानदार फॉर्ममध्ये आहे, परंतु 2023 च्या विश्वचषकापूर्वी आवश्यक असल्यास बदल करण्यास अजून वेळ आहे.
आशिया चषक 2023 साठी पाकिस्तानचा संघ: बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, सौद शकील, तय्यब ताहिर (राखीव).
आशिया चषक 2023 साठी नेपाळचा संघ: रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्तेल, आसिफ शेख, भीम शार्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंग आयरे, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतिश जीसी, मौसम ढकल, संदीप जोरा, किशोर महतो, अर्जुन सौद.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.