Asia Cup 2023: बहुप्रतिक्षित भारत - पाकिस्तान सामना होऊ शकतो रद्द, कारण...

India vs Pakistan: आशिया चषकात २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यात मोठा अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2023 India vs Pakistan match Kandy Weather Reports:

आशिया चषक 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी चाहत्यांमध्ये आतुरता दिसून येत आहे. त्यातही भारत आणि पाकिस्तान संघात होणाऱ्या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. पण आता चाहत्यांच्या उत्सुकतेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आशिया चषक 2023 स्पर्धेत 2 सप्टेंबर रोजी कँडीतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. पण या सामन्यावेळी कँडीमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

India vs Pakistan
India vs Pakistan: भारत-पाकिस्तान फायनलमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! नो-बॉलवर विकेट अन्...

अनेक रिपोर्ट्सनुसार 2 सप्टेंबर रोजी कँडीमध्ये पावसाची शक्यता 60 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान संघात होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा येऊ शकतो.

जर पावसामुळे अडथळा आला, तर सामना रद्द होण्याचीही शक्यता निर्माण होऊ शकते किंवा काही षटके कमी होऊ शकतात. कारण साखळी फेरीदरम्यान राखीव दिवसाचा पर्याय ठेवण्यात आलेला नाही. राखीव दिवस अंतिम सामन्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा असेल की हा सामना रद्द होऊ नये.

कट्टर प्रतिस्पर्धी

क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जातात. त्यामुळे या दोन संघातील सामन्यांत रोमांचही पाहायला मिळतो.

दरम्यान, गेल्या काही काळापासून राजकीय तणावामुळे या दोन संघात द्विपक्षीय मालिका होत नाहीत. त्यामुळे केवळ आयसीसी आणि आशियाई स्पर्धांमध्ये हे संघ आमने-सामने येतात. त्याचमुळे चाहत्यांना या दोन संघातील सामने पाहाण्याचा आनंद क्वचितच घेता येतो.

मात्र, यंदा आशिया चषक आणि वर्ल्डकप २०२३ स्पर्धा होणार असल्याने या दोन संघ एकापेक्षा अधिकवेळा आमने-सामने येणार आहेत. परंतु, यावर्षीतील या दोन संघातील पहिल्याच सामन्यावर पावसाचे सावट आहे.

India vs Pakistan
India vs Pakistan: सामना भारत-पाकिस्तानचा, चर्चा मात्र बटलरची, पण का?

सहा संघात रंगणार स्पर्धा

दरम्यान, आशिया चषक 2023 स्पर्धेबद्दल सांगायचे झाले तर ही स्पर्धा यंदा वनडे प्रकारात खेळवली जाणार आहे. आशिया चषक 2023 चे पाकिस्तान यजमान असून या स्पर्धेतील 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि 9 सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत.

यावर्षी भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे सहा संघ या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे तीन संघ अ गटात आहेत, तर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे तीन संघ ब गटात आहेत.

पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ संघात मुलतानला 30ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. साखळी फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करणार आहेत. सुपर फोर फेरीतील अव्वल दोन संघात 17 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे अंतिम सामना खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com