Shardul Thakur Dainik Gomantak
क्रीडा

व्ह्युवरशिपमध्येही IND vs PAK सामन्याचा विक्रम! इतिहासात पहिल्यांदाच 'इतक्या' कोटी लोकांनी पाहिली मॅच

Asia Cup 2023: आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडलेल्या सुपर फोरच्या सामन्याने व्ह्युवरशिपच्या बाबतही ऐतिहासिक विक्रम नोंदवला.

Pranali Kodre

Asia Cup 2023 India vs Pakistan, Viewership Record:

आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर फोर फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा निकाल सोमवारी (11 सप्टेंबर) लागला. कोलंबोला झालेल्या या सामन्यात भारताने तब्बल 228 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा धावांच्या तुलनेतील वनडेमध्ये चौथा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

याबरोबरच या सामन्यात व्ह्युवरशिपचाही मोठा इतिहास रचला गेला. याबद्दल बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी माहिती दिली आहे. जय शाह यांनी ट्वीट केल्यानुसार भारत आणि पाकिस्तान संघात झालेला सामना डिज्नी प्लस हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 2.8 कसोटी युजर्सने एकाचवेळी पाहिला.

डिजिटल प्लॅटफॉर्मच्या इतिहासात भारतीय संघाच्या सामन्याला मिळालेले हे सर्वाधिक युजर्स आहेत. यापूर्वी हा विक्रम 2019 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या उपांत्य सामन्याच्या नावावर होता. त्यावेळी 2.52 कोटी युजर्सने एकाचवेळी हा सामना पाहिला होता.

दरम्यान, विराट कोहलीचीही क्रेज यावेळी दिसून आले. त्याने शतक केले, त्याचवेळी 2.7 कोटी युजर्स हा सामना पाहत होते.

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, हा सामना रविवारी (10 सप्टेंबर) सुरू झाला होता. पण रविवारी पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नव्हता. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असताना 24.1 षटकानंतर सामना थांबला होता. त्यानंतर राखीव दिवशी उर्वरित सामना खेळवण्यात आला.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 2 बाद 356 धावा उभारल्या. भारताकडून केएल राहुलने 106 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या. तसेच विराटने 94 चेंडूत 122 धावांची नाबाद खेळी केली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 233 धावांची भागीदारी केली.

त्यापूर्वी रोहित शर्माने 56 धावा आणि शुभमन गिलने 58 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 32 षटकात 8 बाद 128 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त असताना सामना तिथेच थांबवण्यात आला. त्यामुळे भारताने विजय मिळवला.

पाकिस्तानकडून फखर जमानने सर्वाधिक 27 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय कोणालाही 25 धावांचा टप्पा पार करता आला नाही. भारताकडून कुलदीप यादवने 5 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navi Mumbai Airport: नवी मुंबईला मिळाली जागतिक ओळख, नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; पाहा खास Photos Videos

लेट नाईट ऑपरेशन! कोलवा येथे मसाज पार्लरमधून नऊ मुलींची सुटका; पोलिस, अर्ज यांची संयुक्त कारवाई

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

Goa Nestle Case : नेस्लेला मोठा दिलासा! 300 कोटींच्या तक्रारीवर पडदा; "मॅगी सॉस घोटाळा" CCI ने फेटाळला

Pakistan Terror Attack: पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला, लेफ्टनंट कर्नल, मेजरसह 11 ठार; 'या' दहशतवादी गटाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

SCROLL FOR NEXT