IND vs PAK: KL राहुलच्या शतकाचं कौतुक करताना वेंकटेश प्रसादला आठवला धोनी, म्हणाला...

Venkatesh Prasad on KL Rahul Century: पाकिस्तानविरुद्ध शतक केल्यानंतर वेंकटेश प्रसादने केएल राहुलचे कौतुक केले आहे.
KL Rahul | Venkatesh Prasad
KL Rahul | Venkatesh PrasadDainik Gomantak
Published on
Updated on

Venkatesh Prasad Tweet After KL Rahul Century against Pakistan in Asia Cup 2023 :

आशिया चषकात 2023 स्पर्धेच्या सुपर फोर फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना रविवारी सुरू झाला आहे. पण रविवारी पावसामुळे हा सामना पूर्ण न झाल्याने राखीव दिवशी सोमवारी उर्वरित सामना खेळवला जात आहे. या सामन्यात विराट कोहली अणि केएल राहुल यांनी शतके ठोकली आहेत. यानंतर वेंकटेश प्रसादने केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.

प्रसादने विराट आणि केएल राहुल यांनी शतके केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना एमएस धोनीच्या पहिल्या शतकाचीही आठवण करून दिली आहे.

त्याने ट्वीट केले की 'केएल राहुल आणि विराट कोहलीचे शानदार शतक. दोघांनीही खूप सहज आणि आनंददायी फलंदाजी वाटावी अशी खेळी केली. त्यामुळे भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सर्वोच्च धावसंख्यची बरोबरी केली. त्यांनी ज्या धावसंख्येची बरोबरी केली ती धावसंख्या विशाखापट्टणममध्ये धोनीच्या आगमनासाठी ओळखली जाते.'

KL Rahul | Venkatesh Prasad
IND vs PAK: पाकिस्तानला रातोरात तगडा झटका! भारताविरुद्ध एक गोलंदाज कमी घेऊन खेळणार, कारण...

दरम्यान, भारताने या सामन्यात 50 षटकात 2 बाद 356 धावा केल्या. ही पाकिस्तानविरुद्ध भारताने उभारलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 5 एप्रिल 2005 रोजी विशाखापट्टणमला भारताने पाकिस्तानविरुद्ध 50 षटकात 9 बाद 356 धावा केल्या होत्या.

त्यामुळे या धावसंख्येशी आता बरोबरी झाली आहे. विशेष म्हणजे 2005 ला झालेल्या त्या सामन्यात धोनीने त्याचे पहिले वनडे शतक झळकावताना 148 धावांची खेळी केली होती. याच गोष्टीची आठवण वेंकटेश प्रसादने करून दिली आहे.

तथापि, यापूर्वी अनेकदा वेंकटेश प्रसादने केएल राहुलच्या खेळावर टीका केली होती. पण काही दिवसांपूर्वीच त्याने म्हटले होते की केएल राहुलने चांगला खेळ करून त्याच्यासारख्या टीकाकारांना उत्तर द्यावे. दरम्यान आता केएल राहुलनेही शतकासह दमदार पुनरागमन केले आहे. केएल

KL Rahul | Venkatesh Prasad
IND vs PAK: रोहित-गिलनंतर कोहली-राहुलचाही पाकिस्तानी गोलंदाजांना दणका! वनडेत चौथ्यांदाच झाला 'हा' पराक्रम

केएल राहुलचे पुनरागमन

केएल राहुलचा हा पुनरागमनाचा सामना आहे. त्याला आयपीएल 2023 स्पर्धेवेळी दुखापत झाल्यानंतर त्याच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याने भारतीय संघाकडून त्याने शतकासह यशस्वी पुनरागमन केले आहे.

केएल राहुलने या सामन्यात विराट कोहलीसह तिसऱ्या विकेटसाठी दीडशे धावांची भागीदारी रचली आहे. याबरोबरच त्याने 100 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. हे त्याचे वनडेतील सहावे शतक ठरले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 15 वे शतक ठरले आहे.

केएल राहुलने या सामन्यात 106 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद १११ धावा केल्या आहेत. तसेच विराटने 94 चेंडूत 122 धावांची नाबाद खेळी केली. त्यापूर्वी भारताकडून शुभमन गिलने 58 धावांची आणि रोहित शर्माने 56 धावांची खेळी केली होती.

पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com