India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान मॅच तिकिटांच्या थक्क करणाऱ्या किंमती, तरीही काही तासातच 'सोल्ड आऊट'

India vs Pakistan: आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

Pranali Kodre

Asia Cup 2023 India vs Pakistan match tickets price:

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी 17 ऑगस्टपासून तिकिट सेलची घोषणा केली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आशिया चषकातील सर्व 13 सामन्यांचे तपशील उपलब्ध आहेत. दरम्यान, तिकिट उपलब्ध झाल्यानंतर गुरुवारी लगेचच काही तासातच भारत आणि पाकिस्तान संघात होणाऱ्या सामन्यांची तिकिटे विकली गेली आहेत.

आशिया चषक स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतानला खेळवला जाणार आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान संघात 2 सप्टेंबर रोजी कँडीमध्ये खेळवला जाणार आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी पाकिस्तान आशिया चषकाचे अधिकृत आयोजक आहेत.

या सामन्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये चांगलीच दिसून येत आहे. कारण संध्याकाळी 7 वाजता पाकिस्तानने तिकिटे उपलब्ध केली होती. त्यातील व्हीआयपी तिकिटे तासाभरातच संपली. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान सामन्यांची तिकिटांची किंमतही अधिक होती. असे असतानाही ही तिकिटे झटपट संपली आहेत.

या सामन्याची तिकिटे तीन प्रकारात विभागण्यात आली होती. स्टँडिंग, व्हीआयपी, व्ही-व्हीआयपी असे तीन प्रकार होते. यातील स्टँडिंग तिकिटांची किंमत 2500 रुपये अशी होती, व्हीआयपी तिकिटे 10 हजार रुपये आणि व्ही-व्हीआयपी तिकिटे 25 हजार रुपये इतकी होती.

या आशिया चषकातील सुपर सिक्स फेरीसाठी ए ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश आहे, तर बी ग्रुपमध्ये गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.

दरम्यान, भारताचा सुपर सिक्समधील दुसरा सामना 4 सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध होणार आहे. या सामन्यांच्या तिकिटांची किंमत 830 रुपयांपासून ते 4000 रुपयांपर्यंत आहेत.

तथापि, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आशिया चषकाचे ज्याप्रकारे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, त्यानुसार जर सुपर फोरमध्ये भारत आणि पाकिस्तान संघांनी प्रवेश केला, तर या दोन संघात 10 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे हा सामना होईल.

ही 16 वी आशिया चषक स्पर्धा वनडे क्रिकेट स्वरुपात खेळवली जाणार असून एकूण 13 सामने होणार आहेत. यातील 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि अंतिम सामन्यासह 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे होणार आहे.

आशिया चषकाचे वेळापत्रक

सुपर सिक्स

  • 30 ऑगस्ट - पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - मुलतान, पाकिस्तान (वेळ: दुपारी 3.30 वाजता)

  • 31 ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - कँडी, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

  • 2 सप्टेंबर - भारत विरुद्ध पाकिस्तान - कँडी, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

  • 3 सप्टेंबर - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - लाहोर, पाकिस्तान (वेळ: दुपारी 3.30 वाजता)

  • 4 सप्टेंबर - भारत विरुद्ध नेपाळ - कँडी, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

  • 5 सप्टेंबर - अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका - लाहोर, पाकिस्तान (वेळ: दुपारी 3.30 वाजता)

सुपर फोर

  • 6 सप्टेंबर - ए1 विरुद्ध बी2 - लाहोर, पाकिस्तान (वेळ: दुपारी 3.30 वाजता)

  • 9 सप्टेंबर - बी1 विरुद्ध बी2 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

  • 10 सप्टेंबर - ए1 विरुद्ध ए2 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

  • 12 सप्टेंबर - ए2 विरुद्ध बी1 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

  • 14 सप्टेंबर - ए1 विरुद्ध बी1 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

  • 15 सप्टेंबर - ए2 विरुद्ध बी2 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

17 सप्टेंबर - अंतिम सामना - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 2.00 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT