Ishan Kishan Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NEP: सुपर फोरच्या जागेसाठी नेपाळ-भारत निर्णायक सामना! कशी असेल रोहितसेनेची 'प्लेइंग-11'?

Asia Cup 2023: सोमवारी नेपाळविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, जाणून घ्या.

Pranali Kodre

Asia Cup 2023 India Predicted Playing XI against Nepal:

आशिया चषक 2023 स्पर्धेत सोमवारी (4 सप्टेंबर) भारताचा साखळी फेरीतील दुसरा सामना नेपाळविरुद्ध होणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कँडी येथील पाल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. नेपाळचाही हा साखळी फेरीतील दुसरा सामना आहे.

दरम्यान, या सामन्यात विजय मिळवणारा संघ सुपर फोर फेरीत पोहचणार आहे. सध्या अ गटातून पाकिस्तानने सुपर फोरमध्ये जागा मिळवली आहे. आता भारत आणि नेपाळ या दोन्ही संघांना संधी आहे.

तथापि, भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्याने भारताच्या खात्यात 1 गुण आहे, परंतु, नेपाळच्या खात्यात शुन्य गुण आहेत. त्यांना पहिल्या सामन्यात पाकिसतानविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता.

त्यामुळे आता भारत आणि नेपाळ हा सामना रद्द झाला किंवा बरोबरीत सुटला किंवा भारताने जिंकला, तर भारतीय संघ सुपर फोर फेरीत जाईल, तर नेपाळला सुपर फोर फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी विजय आवश्यकच आहे.

कशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन?

दरम्यान, या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल सांगायचे झाल्यास फलंदाजी फळीत बदल होण्याची शक्यता कमी आहे. पण गोलंदाजीत एक बदल होऊ शकतो. शार्दुल ठाकूर ऐवजी मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. याशिवाय मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे.

नेपाळविरुद्धही सलामीला कर्णधार रोहित शर्माबरोबर शुभमन गिल खेळताना दिसू शकतो. तसेच मधल्या फळीत विराट कोहली, श्रेयस अय्यर असू शकतात. त्याचबरोबर यष्टीरक्षक म्हणून इशान किशन खेळू शकतो. अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा खेळू शकतात. हार्दिक वेगवान गोलंदाजीत, तर जडेजा फिरकी गोलंदाजीत योगदान देईल.

याशिवाय चायनामन गोलंदाज कुलदीप यादवही संघात कायम राहू शकतो, तर वेगवान गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमराहवर असेल, त्याला मोहम्मद सिराजचीही साथ मिळू शकते.

  • नेपाळविरुद्ध भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर / मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT