IND vs PAK: विराट की रोहित, कोणाची विकेट आवडली? शाहिन आफ्रिदी म्हणतोय...

Shaheen Shah Afridi: भारताविरुद्ध शाहिन आफ्रिदीने ४ विकेट्स मिळवल्या, ज्याच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या विकेट्सचाही समावेश होता.
Shaheen Shah Afridi | Rohit Sharma
Shaheen Shah Afridi | Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Shaheen Shah Afridi revealed favourite Wicket Between Virat Kohli and Rohit Sharma:

शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आशिया चषकातील सामना होणार होता, पण कँडीतील पाल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा सामना पहिल्या डावानंतर रद्द करण्यात आला. पहिला डाव संपल्यानंतर पावसामुळे पुढे खेळ सुरू होऊ शकला नाही.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताचा डाव 48.5 षटकात 266 धावांवर संपला. त्यानंतर पावसामुळे सामनाधिकाऱ्यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या सामन्यात प्रथम गोलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तान संघाकडून वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यातही शाहिन शाह आफ्रिदीने चमकदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 35 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच 10 पैकी 2 षटके त्याने निर्धाव टाकली.

Shaheen Shah Afridi | Rohit Sharma
IND vs PAK: सावधान! पाकिस्तानविरुद्ध सामना रद्द झाला, तरी भारतीय संघाला 'या' बाबतीत रहावे लागणार सतर्क

आफ्रिदीने सुरुवातीलाच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना त्रिफळाचीत करत भारताला मोठे धक्के दिले होते. दरम्यान, भारताचा डाव संपल्यानंतर आफ्रिदीने त्याला या सामन्यातील आवडलेल्या विकेटबद्दल खुलासा केला होता.

आफ्रिदीने सांगितले, 'आमची नवीन चेंडूसह तिच योजना होती. मला वाटते विराट आणि रोहित दोघांच्याही विकेट्स महत्त्वाच्या होत्या. प्रत्येक फलंदाज माझ्यासाठी सारखाच आहे. पण मला वाटते, मला रोहितची विकेट जास्त आवडली.'

आफ्रिदीने रोहितला पाचव्या षटकात आणि विराटला सातव्या षटकात वेगात चेंडू टाकत त्रिफळाचीत केले होते. तसेच नंतर त्याने 44 व्या षटकात अर्धशतक करणाऱ्या हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडजेला बाद केले. हार्दिकचा झेल आघा सलमानने घेतला, तर जडेजाचा झेल मोहम्मद रिझवानने घेतला.

विशेष म्हणजे एकाच वनडे डावात विराट आणि रोहित या दोघांनाही त्रिफळाचीत बाद करणारा आफ्रिदी पहिलाच गोलंदाज ठरला.

Shaheen Shah Afridi | Rohit Sharma
'आमच्याकडे शाहिन, नसीम, रौफ नाही, पण...' IND vs PAK सामन्यापूर्वी कर्णधार रोहितची प्रतिक्रिया

तसेच आफ्रिदी पुढे म्हणाला, 'आमच्या वेगवान गोलंदाजांच्या योजना यशस्वी ठरल्या. नसीमने ताशी 150 किमीने गोलंदाजी केली, त्याबद्दल खूश आहे. तो खरंच वेगवान होता. नवीन चेंडू कदाचीत स्विंग आणि सीम होत होता, पण त्यानंतर फार काही होत नव्हते. चेंडू जुना झाल्यानंतर धावा करणे सोपे होते.'

दरम्यान, भारताने या सामन्यात 66 धावांत 4 विकेट्स गमावल्यानंतर हार्दिक पंड्या आणि इशान किशनने अर्धशतके झळकावण्याबरोबरच 5 व्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे भारताने 200 धावांचा टप्पा ओलांडला.

हार्दिक 90 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 87 धावा करून बाद झाला आणि इशान 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 82 धावा करून बाद झाला. त्यानंतर भारताची तळातील फलंदाजीही कोलमडली.

पाकिस्तानकडून आफ्रिदीव्यतिरिक्त हॅरिस रौफ आणि नसीम शाह या दोघांनीही प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे वनडे स्वरुपात खेळल्या जाणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत एका डावातील सर्व 10 विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. शाहिन आफ्रिदी, रौफ आणि नसीम हे तिघेही वेगवान गोलंदाज आहेत.

दरम्यान, पाकिस्तानने सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. पण अद्याप भारताचा नेपाळविरुद्धचा सामना बाकी आहे. हा सामना सोमवारी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com