Sri Lanka Team, Team India, Pakistan Team Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: भारतासमोर फायनलमध्ये कोणाचं आव्हान? पाकिस्तान-श्रीलंका संघांचं भवितव्य 'या' सामन्यावर

Equation for Final: भारतीय संघाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला असून आता पाकिस्तान आणि श्रीलंकेसमोर कसे समीकरण आहे जाणून घ्या.

Pranali Kodre

Asia Cup 2023 Final Equations:

आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर फेरीतील सामने सध्या कोलंबोमध्ये रंगत आहेत. सुपर फोरमधील गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर राहणारे संघ अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, भारतीय संघाने मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध 41 धावांनी विजय मिळवत पहिल्या दोनमध्ये स्थान पक्के करत अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी एकच जागा शिल्लक असून त्यासाठी पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन दावेदार आहेत.

भारताने सुपर फोरमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांना पराभूत करत 4 गुण मिळवले आहेत. सध्या भारत गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.

तसेच श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन संघ प्रत्येकी 2 गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघांनी एक विजय आणि एक पराभव स्विकारला आहे.

त्याचबरोबर सुपर फोरमधील पहिले दोन्ही सामने पराभूत होणारा बांगलादेश संघ चौथ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, बांगलादेश अंतिम सामन्यात पोहण्याच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यात 15 सप्टेंबरला होणारा सुपर फोरचा अखेरचा सामना गुणतालिकेत मोठा बदल घडवणार नाही आणि निर्णायक ठरणार नाही.

पण 14 सप्टेंबरला होणारा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका हा सामना अंत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याच सामन्यावर या दोन्ही संघांचे स्पर्धेतील भवितव्य ठरणार आहे.

कसे आहे समीकरण?

श्रीलंका आणि पाकिस्तान संघात 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणारा संघ भारताविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. कारण विजय मिळवणाऱ्या संघाचे 4 गुण होणार आहेत. त्यामुळे तो संघ पहिल्या दोन क्रमांकात स्थान मिळवेल.

मात्र, 14 तारखेला कोलंबोमध्ये पावसाची शक्यताही आहे. त्यामुळे जर पावसामुळे हा सामना झाला नाही किंवा सामना रद्द झाला, तर श्रीलंका आणि पाकिस्तानला विभागून 1 गुण देण्यात येणार आहे. असे झाल्यास श्रीलंका नेट रनरेटच्या जोरावर पाकिस्तानला मागे टाकून अंतिम सामन्यात प्रवेश करेल. तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर राहिल.

अंतिम सामना

आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर, रविवारी होणार आहे. हा सामना कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT