Afghanistan Team Twitter/ @ACBofficials
क्रीडा

Asia Cup 2022 साठी अफगाणिस्तान संघाची घोषणा, मोहम्मद नबी करणार नेतृत्व

Afghanistan Team: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) मंगळवारी आशिया चषक 2022 साठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली.

दैनिक गोमन्तक

Asia Cup 2022: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) मंगळवारी आशिया चषक 2022 साठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व स्टार अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी करणार आहे. एसीबीने नबीकडे संघाचे कर्णधारपद सोपवले असतानाच अनुभवी फलंदाज समिउल्लाह शिनवारीलाही संघात संधी देण्यात आले आहे. शिनवारीने मार्च 2020 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानसाठी शेवटचा सामना खेळला होता. शरफुद्दीन अश्रफच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. अफगाणिस्तानचा संघ 27 ऑगस्टला श्रीलंकेविरुद्धच्या आशिया चषकात आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

दरम्यान, संघ निवडीबद्दल मुख्य निवडकर्ते नूर मलिकझाई म्हणाले, "आशिया चषक ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची स्पर्धा असून त्यासाठी आम्ही आमच्या सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे. समिउल्लाह शिनवारीचा आशिया कपसाठी (Asia Cup) संघात समावेश करण्यात आला आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर इब्राहिम झद्रान, हशमतुल्ला शाहिदी, नजीबुल्ला झद्रान आणि मोहम्मद नबी (Mohammad Nabi) यांसारखे धुरंधर फलंदाज संघात आहेत.''

आशिया चषक 2022 साठी अफगाणिस्तान संघ: मोहम्मद नबी (Captain), नजीबुल्लाह झदरन (उपकर्णधार), अफसर झझाई (विकेटकीपर), अजमतुल्ला ओमरझाई, फरीद अहमद मलिक, फजल हक फारुकी, हशमतुल्ला शाहिदी, हजरतुल्ला झाझाई, इब्राहिम झदरन, करीम जनात, मुजीब उर रहमान, नजीबुल्ला झदरन, नूर अहमद, नजीबुल्ला झदरन, नूर अहमद रहमानउल्ला गुरबाज, रशीद खान, समीउल्ला शिनवारी.

राखीव खेळाडू : निजात मसूद, कैस अहमद, शराफुद्दीन अश्रफ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT