Virat Kohli Performance: 23 नोव्हेंबर 2019 रोजी विराट कोहलीने शेवटचे शतक झळकावले होते. कोरोनामुळे जवळपास वर्षभर क्रिकेटमध्ये चढउतार बघायला मिळाले. सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वात विराटच्या फॉर्मची चर्चा आहे. (Virat Kohli Performance Against Pakistan)
चालू वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, विराटने या वर्षी फक्त 4 टी-20 सामने खेळले आहेत आणि 20.52 च्या सरासरीने केवळ 81 धावा केल्या आहेत, जे विराटच्या क्षमतेच्या क्रिकेटपटूसाठी अतिशय माफक आहे. त्याचवेळी विराटने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर विश्रांती घेतली आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत तो संघाचा भाग नव्हता.
क्षणभर विश्रांती, पुढे विराट करणार क्रांती
आता विराट आशिया कपमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहे. 27 ऑगस्टपासून आशिया कप खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. चांगली गोष्ट म्हणजे विराटची बॅट पाकिस्तानविरुद्ध खूप गरजते. विराटची पाकिस्तान विरूद्धची खेळी क्रिकेटप्रेमिंना नेहमीच प्रभावित करते.
28 ऑगस्टचा दिवस प्रत्येक क्रिकेट चाहत्यासाठी महत्त्वाचा आहे, या दिवशी टीम इंडिया आशिया कपमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल आणि टिम इंडियाचा सामना पाकिस्तानसोबत असेल. 2012 ते 2021 पर्यंत कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या 7 टी-20 सामन्यांमध्ये 77.75 च्या प्रभावी सरासरीने 311 धावा केल्या आहेत. विराटने पाकिस्तानविरुद्ध 3 अर्धशतके झळकावली असून नाबाद 78 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्यामुळे हा सामना विराटसाठी आणि त्याच्या फॅनसाठी एक आशा घेवून येणारा आहे.
वनडेतही विराटची ख्याती
एकदिवसीय क्रिकेटमध्येही विराटची पाकिस्तानविरुद्धची सर्वोत्तम धावसंख्या 183 आहे. विशेष म्हणजे विराटने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या केली आहे. वर्ष होते 2011 आणि विराट त्यावेळी टीम इंडियामध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करणारा युवा फलंदाज होता. बांगलादेशच्या मीरपूरमध्ये पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 329 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर विराटने 22 चौकार आणि 1 षटकारासह अवघ्या 148 चेंडूत 183 धावांची धडाकेबाज खेळी केली. टीम इंडियाने हा सामना 6 विकेटने जिंकला होता.
आशिया कप म्हणजे विराटच्या यशाची हमी
आशियातील टी-20 फॉरमॅटबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहली आता फक्त 4 डाव खेळला आहे पण यामध्ये त्याने 76.50 च्या सरासरीने 153 धावा केल्या आहेत. त्याची 56 धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्येही किंग कोहलीची जादू थांबलेली नाही. आशिया कप वनडेमध्ये खेळल्या गेलेल्या 10 डावांमध्ये विराटने 61.30 च्या सरासरीने 613 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.