Ashutosh Pednekar dainik gomantak
क्रीडा

आशुतोष पेडणेकरने ‘गद्रे’ गास्पार डायस खुल्या टेनिस स्पर्धेत एकेरीसह दुहेरीत पुढील फेरी गाठली

आशुतोषने व्हेटरन गटात महंमद इलियास हुडली याला 6-1 फरकाने हरविले

दैनिक गोमन्तक

पणजी : आशुतोष पेडणेकर याने ‘गद्रे’ गास्पार डायस खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी आगेकूच राखताना एकेरी, तसेच दुहेरीतही पुढील फेरी गाठले. व्हेटरन्स गटात समीर काकोडकर यानेही पुढील फेरीत प्रवेश केला. स्पर्धा मिरामार येथे क्लब टेनिस द गास्पार डायस व कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या टेनिस कोर्टवर खेळली जात आहे. (Ashutosh Pednekar made a winning start in the Gadre Gaspar Dias Open Tennis Tournament)

आशुतोषने 45 वर्षांवरील व्हेटरन गटात महंमद इलियास हुडली याला 6-1 फरकाने हरविले. दुहेरीत आशुतोषने राजेश डिसोझा याच्या साथीत सोमशेखर व सदानंद जोडीस 6-0 फरकाने पराजित केले. व्हेटरन्स गटातील 55 वर्षांवरील वयोगटात समीर काकोडकरने नरसिंह रेड्डी याला 6-3 फरकाने पराजित करून पुढील फेरी गाठली. नोएल नोरोन्हा व राजाराम कुंडईकर जोडीस दुहेरीत पुढे चाल मिळाली.

व्हेटरन्स गटातील 60 वर्षांवरील वयोगटातील पुरुष (Men) एकेरीत मनोज चंडीरामाणी याने रामास्वामी बाला याच्यावर 6-0 फरकाने, प्रेमसागर खुराना याने प्रमोद साळवी याच्यावर 6-3 फरकाने मात केली. दुहेरीत रामास्वामी व आर. एन. रमेश जोडीने भंवरलाल व प्रेमप्रकाश जोडीवर 6-1 फरकाने विजय नोंदविला.

इतर निकाल : दुहेरी : देवेंद्र होशिंग व जिजेश नायर वि. वि. समीर काकोडेकर व गिरिराज 6-4, सचिन दुकळे व केविन रिबेलो वि. वि. राजेश धादोती व कापसे 6-0, शीतल भोसले व पृथ्विराज इंगळे वि. वि. उमराणी व संदीप 6-2, प्रलय बक्षी व निकुंज गुप्ता वि. वि. हरीश व राजेश 6-4, विजय पत्की व राहुल सुवर्णा वि. वि. अनिल सिंग व रॉबर्ट डिसोझा 6-1, सचिन व सद्‍गुरू वि. वि. अमेय व भस्मे 6-3.

एकेरी : दिमित्री स्मिर्नोव वि. वि. गॉर्डन लुईस 6-0, कुसरो सादरी वि. वि. मनोज पांडे 6-2, यून जेओंग वि. वि. येनेपोया अजमल 6-2, मनोज पांडे वि. वि. अशोक कोळेकर 6-4, हिरेन भेडा वि. वि. वीरण्णा 7-3 (5)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT