Joe Root Dainik Gomantak
क्रीडा

Joe Root Video: विकेट हवी आहे? मग जगातील नंबर-1 बॅटर आहे ना! पाहा रुटने घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट्स

Ashes 2023: लॉर्ड्स कसोटीत जो रुटने ऑस्ट्रेलियाच्या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत इंग्लंडला मोठा दिलासा दिला.

Pranali Kodre

Ashes 2023 Lords Test, Joe Root Takes Two important Wickets: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या ऍशेस 2023 मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर बुधवारपासून (28 जून) सुरू आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी वर्चस्व गाजवले, पण असे असले तरी जो रुटने घेतलेल्या विकेट्सनेही सर्वांचे लक्ष वेधले.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (66) आणि उस्मान ख्वाजा (17) यांनी 73 धावांची सलामी भागीदारी करत चांगली सुरुवात केली.

पण त्यानंतर त्या दोघांनाही थोड्या अंतरात जोश टंगने त्रिफळाचीत केले. पण त्यानंतरही मार्नस लॅब्युशेन आणि स्टीव्ह स्मिथने 102 धावांची शतकी भागीदारी केली. मात्र लॅब्युशेन 47 धावा करून बाद झाला.

मात्र, त्यानंतरही स्मिथला ट्रेविस हेडने भक्कम साथ दिली. एका बाजून हेडने आक्रमण केले, तर दुसऱ्या बाजूने स्मिथने डाव सांभाळला. या दोघांनीही शतकी भागीदारी केली. त्यांची जोडी तोडण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने विविध पर्याय वापरले. अखेर त्याने 71 व्या षटकापासून जो रुटला गोलंदाजासाठी चेंडू हातात दिला.

रुटनेही कर्णधाराचा विश्वास कायम करताना 75 व्या षटकात इंग्लंडला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने या षटकातील टाकलेल्या दुसऱ्या चेंडूच्या फिरकीत ट्रेविस हेड अडकला. हेड शॉट खेळताना चूकला आणि यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने त्याला यष्टीचीत केले. त्यामुळे हेडला 73 चेंडूत 77 धावा करून माघारी परतावे लागले.

त्याच षटकात रुटने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर कॅमेरॉन ग्रीनने मोठा फकटा मारण्याच्या हेतूने पुल शॉट खेळला, पण त्याचा झेल जेम्स अँडरसनने घेतला. ग्रीनला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे हे षटक इंग्लंडसाठी महत्त्वाचे ठरले. या षटकात इंग्लंडला दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्या. त्यामुळे किमान पहिल्या दिवशी इंग्लंडला ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ बाद करण्यात यश आले.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की जो रुट सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. पण तो पार्ट-टाईम गोलंदाज म्हणून अनेकदा गोलंदाजी करताना दिसतो.

दरम्यान, पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 83 षटकात 5 बाद 339 धावा केल्या आहेत. स्मिथ 85 धावांवर नाबाद आहे, तसेच ऍलेक्स कॅरी 11 धावांवर नाबाद खेळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT