Ben Stokes Dainik Gomantak
क्रीडा

Ben Stokes Video: 4, WD, 6, 6, 6 अन् स्टोक्सचा कांगारुंना शतकी दणका! 'हा' रेकॉर्डही केला नावावर

Ashes 2023: लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर आक्रमण करत शतकी खेळी केली.

Pranali Kodre

Ashes 2023, Ben Stokes Century during Lords Test: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या ऍशेस 2023 मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडकडून चौथ्या डावात कर्णधार बेन स्टोक्सने शतकी खेळी केली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर 371 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सुरुवातीला झटपट विकेट्स गमावल्या. पण नंतर बेन स्टोक्स आणि बेन डकेट यांनी 5 व्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी केली.

पण डकेट 83 धावांवर बाद झाला, तर जॉनी बेअरस्टो 10 धावांवर वादग्रस्तरित्या धावबाद झाला. असे असतानाही स्टोक्सने आपली लय कायम ठेवताना सलग तीन षटकार ठोकत शतक साकारले.

त्याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 56 व्या षटकात कॅमेरॉन ग्रीनविरुद्ध पहिल्या चेंडूवर चौकार मारला, त्यानंतरचा चेंडू ग्रीनने वाईड टाकला. त्यामुळे त्याला दुसरा चेंडू पुन्हा टाकावा लागला. त्यावर स्टोक्सने षटकार खेचला.

त्यानंतरच्या दोन्ही चेंडूवरही स्टोक्सने षटकार ठोकत शतकालाही गवसणी घातली. त्याने 142 चेंडूत शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटीतील 13 वे शतक आहे. तसेच चौथ्या डावात खेळताना त्याने केलेले हे तिसरे शतक आहे.

त्यामुळे तो इंग्लंडकडून चौथ्या डावात 3 शतके करणारा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याआधी जॉफ बॉयकॉट, ग्रॅहम गुच आणि बर्ट सटक्लिफ यांनीही चौथ्या डावात इंग्लंडकडून तीन शतके केली होती.

दरम्यान, स्टोक्सने केलेल्या शतकामुळे सामन्यात रोमांचक वळण आले आहे. या सामन्यात अखेरच्या दिवसाच्या पहिल्या सत्रानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात 57 षटकात 6 बाद 243 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता अखेरच्या दोन सत्रात इंग्लंडला विजयासाठी 128 धावांची गरज आहे, तर ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्सची गरज आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 100.4 षटकात सर्वबाद 416 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडला पहिल्या डावात 76.2 षटकात सर्वबाद 325 धावाच करता आल्या.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 101.5 षटकात सर्वबाद 279 धावा करता आल्या. तसेच त्यांनी पहिल्या डावात घेतलेल्या 91 धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचे आव्हान ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT