Ashes 2023: गिल आऊट, पण डकेट नॉटआऊट! स्टार्कच्या कॅचवर चर्चांना उधाण, पण नियम काय सांगतो?

Mitchell Starc Catch: लॉर्ड्स कसोटीत मिचेल स्टार्कने डकेटचा जमीनीलगत घेतलेल्या झेलावर डकेटला जीवदान मिळाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
Mitchell Starc Catch
Mitchell Starc CatchDainik Gomantak
Published on
Updated on

Why Mitchell Starc catch of Ben Duckett was ruled not out: कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या महिन्याभरात काही वादग्रस्त झेल पाहायला मिळाले आहेत. त्यांची चर्चाही झाली. असाच एक झेल सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या ऍशेल मालिकेतील दुसऱ्या कसोटी कसोटीत मिचेल स्टार्कने घेतला. ज्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर 371 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडने सुरुवातीच्या विकेट्स लवकर गमावल्या असल्या तरी सलामीवीर बेन डकेट चांगली फलंदाजी करत होता.

त्याला कर्णधार बेन स्टोक्सची चांगली साथही मिळाली. पण तो 50 धावांवर फलंदाजी करत असतानाच त्याला तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णयाने जीवदान मिळाले.

Mitchell Starc Catch
Nathan Lyon Video: जिद्द म्हणतात ती हिच! लायननं दाखवलं सिंहाचं हृदय, जखमी पायाने मैदानात उतरला अन्...

झाले असे की ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात 29 व्या षटकात कॅमेरॉन ग्रीनने पाचवा चेंडू आखुड टप्प्याचा टाकला. त्यावेळी डकेटने फाईन लेगला मोठा फटका खेळला. पण स्टार्कने सूर मारत जमीनीलगत झेल घेतला. त्यामुळे मैदानातील पंचांनी डकेटला बाद दिले होते. मात्र, काही वेळातच परत जात असलेल्या डकेटला थांबवण्यात आले.

स्टार्कचा झेल तिसऱ्या पंचांकडून तपासण्यात आला. त्यावेळी रिप्लेमध्ये स्टार्कने झेल घेतल्यानंतर तो जमीनीला टेकल्याचे दिसले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी डकेटला नाबाद दिले आणि त्याला जीवदान मिळाले. पण तिसऱ्या पंचांच्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. कारण स्टार्कने झेल घेतला होता. स्टार्कनेही त्यावर चकीत झाल्याची प्रतिक्रिया दिली.

Mitchell Starc Catch
Ashes 2023 Video: जरा विचित्रच! लॅब्युशेनने ग्राउंडवरील च्युइंगम पुन्हा टाकलं तोंडात, घटना कॅमेऱ्यात कैद

या झेलावर वाद वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर अखेर क्रिकेट नियम करणारी संस्था मेरिलबन क्रिकेट क्लबने (MCC) या निर्णयावर स्पष्टीकरण दिले. एमसीसीने ट्वीट करत नियम समजावला. एमसीसीने सांगितल्याप्रमाणे कलम 33.3 नुसार चेंडू पहिल्यांदा क्षेत्ररक्षकाच्या संपर्कात येण्यापासून ते क्षेत्ररक्षक चेंडू आणि स्वत:वर पूर्ण नियंत्रण मिळवण्यापर्यंतच्या प्रक्रियेनंतर झेल पूर्ण तेव्हा समजला जातो.

त्याचमुळे तिसऱ्या पंचांच्या निरिक्षणानुसार स्टार्कचे झेल घेतल्यानंतर स्वत:वर पूर्ण नियंत्रण मिळवण्यापूर्वीच चेंडू जमीनीला स्पर्श करत होता. ज्यावेळी त्याच्या हातातील चेंडू जमीनीला स्पर्श करत होता, तेव्हा तो स्लाईड करत होता.

दरम्यान, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की याच नियमामुळे कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सलामीवर शुभमन गिलला बाद देण्यात आले होते.

इंग्लंडमधील द ओव्हलवर 7 ते 11 जूनदरम्यान पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलया यांच्यातील अंतिम सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात गिलचा असाच जमीनीलगत झेल कॅमेरॉन ग्रीनने घेतला होता. त्या झेलावरूनही बरीच चर्चा झाली होती. पण त्यावेळी तिसऱ्या पंचांनी ग्रीनने झेल पूर्ण केला होता आणि त्याचे पूर्ण नियंत्रण होते, हा हवाला देत गिलला बाद दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com