England Team  Dainik Gomantak
क्रीडा

Ashes 2023: पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग 11 घोषित, मोईन अलीसह 'या' दिग्गजांना मिळाली संधी

Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 16 जून 2023 पासून खेळवला जाणार आहे.

Manish Jadhav

Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 16 जून 2023 पासून खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लंडमधील एजबॅस्टन येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी जिथे ऑस्ट्रेलियन संघात गोंधळाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे इंग्लंडने आपली प्लेइंग 11 जाहीर केली आहे.

दरम्यान, इंग्लंड (England) क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या संघात अनेक दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. यापैकी निवृत्तीवरुन परतलेल्या मोईन अलीचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, जेम्स अँडरसन आणि ऑली रॉबिन्सन हे पूर्णपणे तंदुरुस्त असून आयर्लंड कसोटीत बाहेर पडल्यानंतर तेही परतले आहेत.

हे खेळाडू फलंदाजीची कमान सांभाळतील

इंग्लंडने जाहीर केलेल्या प्लेइंग 11 नुसार बेन डकेट आणि जॅक क्रॉली हे पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर असतील. याशिवाय, यापूर्वी द्विशतक झळकावणारा ओली पोप तिसऱ्या क्रमांकावर असेल. मधल्या फळीची जबाबदारी जो रुट आणि हॅरी ब्रूक्सवर असेल.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स हा अष्टपैलू खेळाडू असेल. त्याचबरोबर, यष्टिरक्षण जॉन बेअरस्टो करणार आहे. त्याचवेळी, अष्टपैलू मोईन अली (Moeen Ali) फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.

या वेगवान गोलंदाजांसह संघ मैदानात उतरेल

इंग्लंडच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी पोषक आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंडने जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ओली रॉबिन्सन यांना आपल्या संघात ठेवले आहे. बेन स्टोक्स गोलंदाजी करणार आहे. तो गोलंदाजीचा चौथा पर्याय असेल.

इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (क), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, मोईन अली, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रुट, जोश टॉंग, ख्रिस वोक्स , मार्क वुड.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT