Steve Smith | Ben Stokes | Ashes 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Ashes 2023: स्मिथचा कॅच स्टोक्सनं घेतलेला, पण 'या' नियमामुळे ठरला 'नॉटआऊट'

Pranali Kodre

Why Steve Smith not out after Ben Stokes took the catch: ऍशेस 2023 मालिका नुकतीच संपली. द ओव्हलवर झालेला पाचवा कसोटी सामना इंग्लंडने अखेरच्या दिवशी जिंकत या ऍशेस मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले. दरम्यान या सामन्यातील अखेरच्या दिवशी काही नाट्यमय घडामोडीही घडताना दिसल्या. त्यातीलच एक घटना म्हणजे स्टीव्ह स्मिथला देण्यात आलेला नाबादचा निर्णय.

झाले असे की 384 धावांच्या आव्हानचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाला उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी बिनबाद 135 धावा करत चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाने झटपट 3 विकेट्स गमावल्या. त्यामुळे त्यांची अवस्था 3 बाद 169 अशी झाली होती.

मात्र, नंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड यांनी डाव सावरला. पण पहिले सत्र संपायच्या आधी अखेरच्या षटकात स्मिथला जीवदान मिळाले. झाले असे की मोईन अलीने टाकलेल्या चेंडूवर स्मिथने पुढे येऊन बचावात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.

पण स्मिथच्या अपेक्षेपेक्षा चेंडूने जास्तीची उसळी घेतली. त्यामुळे चेंडू स्मिथच्या ग्लव्ह्जला स्पर्शून वर उडाला. त्यावेळी लेग स्लीपला थांबलेला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने उडी मारून एका हाताने हा शानदार झेल घेतला. मात्र आनंदाने सेलिब्रेशन करण्याच्या नादात त्याच्याकडून झेल घेतल्यानंतर हातून चेंडू सुटला.

त्यावर पंचांनी नाबाद दिले कारण नियमानुसार झेल पूर्ण करताना क्षेत्ररक्षक नियंत्रणात हवा. मात्र, स्टोक्सच्या हातून सेलिब्रेशनच्या प्रयत्नात चेंडू सुटला होता. मात्र स्टोक्सने रिव्ह्युची मागणी केली. त्यावेळी तिसरे पंच नितीन मेनन यांनीही स्मिथला नाबाद घोषित केले.

एमसीसी क्रिकेट नियमातील कलम 33.3 नुसार चेंडू पहिल्यांदा क्षेत्ररक्षकाच्या संपर्कात येण्यापासून ते क्षेत्ररक्षक चेंडू आणि स्वत:वर पूर्ण नियंत्रण मिळवण्यापर्यंतच्या प्रक्रियेनंतर झेल पूर्ण तेव्हा समजला जातो.

त्यामुळे स्टोक्स पूर्ण नियंत्रणात येण्यापूर्वीच त्याच्या हातून झेल सुटल्याने स्मिथला जीवदान मिळाले.

दरम्यान, स्मिथने नंतर 54 धावांची खेळी केली. तसेच ट्रेविस हेडने 43 धावा केल्या. पण नंतर कोणाला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही आणि ऑस्ट्रेलियाचा संघ 94.4 षटकात 334 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे इंग्लंडने हा सामना 49 धावांनी जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT