Nathan Lyon | Pat Cummins Dainik Gomantak
क्रीडा

Ashes 2023, 1st Test: कॅप्टन कमिन्सचा विजयी चौकार अन् जग्गजेच्या ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडला घरचा आहेर

England vs Australia: पहिल्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध शेवटच्या दिवशी रोमांचक विजय मिळवला.

Pranali Kodre

Australia won 1st Ashes 2023 Test by 2 Wickets against England: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका सुरू झाली आहे. एजबस्टनला झालेल्या पहिल्याच सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने अखेरच्या दिवशी 2 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.

याबरोबरच 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक करणारा उस्मान ख्वाजा सामनावीराचा मानकरी ठरला.

दहा दिवसांपूर्वीच कसोटी विश्वविजेतेपद पटकावलेल्या ऑस्ट्रेलियाला अखेरच्या दिवशी 174 धावांची गरज होती, तर इंग्लंडला 7 विकेट्सची गरज होती. पण या दिवशी सुरुवातीला पावसाचा अडथळा आला होता.

मात्र, काहीवेळाने सामना सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून खेळपट्टीवर टिकून असलेल्या सलामीवीर उस्मान ख्वाजाला चौथ्या दिवसाच्या अखेरीस नाईटवॉचमन म्हणून खेळायला आलेल्या स्कॉट बोलंडने चांगली साथ दिली. बोलंड 20 धावांवर बाद झाल्यानंतर ट्रेविस हेड (16) आणि कॅमेरॉन ग्रीन (28) यांनीही छोटेखानी खेळी करताना साथ दिली होती. पण हे दोघेही फार काळ टिकू शकले नाही.

त्यांच्यानंतर ख्वाजाही 197 चेंडूत 65 धावांची खेळी करून बेन स्टोक्सविरुद्ध त्रिफळाचीत झाला. त्यानंतर ऍलेक्स कॅरीही 20 धावांवर माघारी परतला. त्यामुळे 281 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था दुसऱ्या डावात 8 बाद 227 अशी झाली होती. त्यांना तेव्हा विजयासाठी जवळपास 16 षटकांमध्ये 54 धावांची गरज होती.

पण त्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सला नॅथन लायनने भक्कम साथ दिली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. या दोघांनी 9 व्या विकेटसाठी 55 धावांची नाबाद भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. 93 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कमिन्सने ऑली रॉबिन्सनविरुद्ध चौकार ठोकला आणि विजयी जल्लोष केला.

कमिन्सने 73 चेंडूत नाबाद 44 धावांची खेळी केली, तर त्याला साथ देताना लायनने 28 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर (36), स्टीव्ह स्मिथ (6) आणि मार्नस लॅब्युशेन (13) यांच्या विकेट्स चौथ्याच दिवशी स्वस्तात गमावल्या होत्या.

दुसऱ्या डावात इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तसेच ऑली रॉबिन्सनने 3 विकेट्स आणि जेम्स अँडरसनने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडने पहिल्याच दिवशी 8 बाद 393 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. इंग्लंडकडून जो रुटने 118 धावांची खेळी केली होती. तसेच जॉनी बेअरस्टोने 78 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने 4 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 386 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 7 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 141 धावांची खेळी केली. याशिवाय ऍलेक्स कॅरीने 66 धावांची आणि ट्रेविस हेडने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून स्टुअर्ड ब्रॉड आणि ऑली रॉबिन्सनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावात इंग्लंडने सर्वबाद 273 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावातील 7 धावांच्या आघाडीमुळे त्यांनी ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 281 धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जो रुट आणि हॅरी ब्रुक यांनी सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली. या दोघांनाही प्रत्येकी ४६ धावा केल्या.

तसेच कर्णधार बेन स्टोक्सने 43 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तसेच स्कॉट बोलंड आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: राष्ट्रीय महामार्ग अनमोड येथे खचल्याने अनमोड घाटावरुन जाण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंद

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT