Joe Root Video: रुटचा नवा अवतार! पहिल्या Ashes मॅचमध्ये टी20 स्टाईल बॅटिंगने ऑसी गोलंदाजांना दिलं टेंशन

Joe Root: पहिल्या ऍशस सामन्यात जो रुटने मारलेल्या आक्रमक शॉट्स चर्चेचा विषय ठरले आहेत.
Joe Root Ashes
Joe Root AshesDainik Gomantak
Published on
Updated on

Joe Root reverse-scoops shots: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या ऍशेस 2023 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बर्मिंगघमला सुरू असून यामध्ये इंग्लंडचे फलंदाज आक्रमक फटकेबाजी करतानाही दिसले. दरम्यान, कसोटी क्रिकेटमधील स्पेशालिस्ट खेळाडू म्हणून ओळखला जाणारा जो रुटही त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध काही शॉट्स खेळताना दिसला.

त्याने या सामन्यातील पहिल्या डावातही खेळलेले शॉट्स चर्चेचा विषय ठरले होते. त्यातच त्याने दुसऱ्या डावातही पुन्हा एकदा त्याच्यातील आक्रमक फलंदाजाची झलक दाखवली.

या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडकडून दुसऱ्या डावात खेळताना रुटने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सविरुद्ध स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला त्यावेळी तो चूकला.

Joe Root Ashes
Moeen Ali: ऍशेसमध्ये मोईनचं कमबॅक, पण बर्थडेलाच ICC कडून मोठी कारवाई, वाचा काय झाली चूक

मात्र, पुढच्या षटकात रुटने माघार न घेता स्कॉट बोलंडच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. त्याने 12 व्या षटकात बोलंडविरुद्ध 2 चौकार आणि 1 षटकार खेचला. यातील 1 चौकार आणि षटकार त्याने रिव्हर्स स्कूपचा शॉट खेळत मारला.

त्याच्या या आक्रमक अंदाजातील फलंदाजीचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना अनेकांनी रुटचे कौतुक केले आहे.

दरम्यान, रुट दुसऱ्या डावात मोठी खेळी करू शकला नाही. तो 55 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 46 धावा करून बाद झाला. त्याने पहिल्या डावात शतकी खेळी केली होती. त्याने 152 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 118 धावांची खेळी केली होती.

Joe Root Ashes
Ashes 2023: ख्वाजाविरुद्ध अपशब्द वापरत सेंड-ऑफ दिल्याबद्दल रॉबिन्सन म्हणतोय, 'सर्वांना हेच हवंय...'

सामना रोमांचक वळणावर

पहिल्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने पहिला डाव 78 षटकात 8 बाद 393 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 116.1 षटकात सर्वबाद 386 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने 66.2 षटकात सर्वबाद 273 धावा केल्या. तसेच पहिल्या डावातील 7 धावांच्या आघाडीमुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 281 धावांचे आव्हान ठेवले.

या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसाखेर 30 षटकात 3 बाद 107 धावा केल्या आहेत. त्यामुळे अखेरच्या दिवशी विजयासाठी ऑस्ट्रेलियाला 174 धावांची गरज आहे, तर इंग्लंडला 7 विकेट्सची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com