Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: चिंता मिटली! बुमराहची उणीव भरुन काढणार हा भेदक गोलंदाज

T20 WC Warm-up Matches: टी-20 वर्ल्ड कप 2022 पूर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

India Vs Western Australia XI: टी-20 वर्ल्ड कप 2022 पूर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. सोमवारी पर्थमध्ये टीम इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पहिला सराव सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाने शानदार विजयाची नोंद केली, तर एका युवा गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीने सर्वांना खूश केले.

पहिल्या सराव सामन्यात या खेळाडूने गोंधळ घातला

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना टीम इंडियाने 20 षटकात 6 गडी गमावून 158 धावा केल्या. या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 145 धावा केल्या. या सामन्यात 23 वर्षीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

जसप्रीत बुमराहची उणीव भासणार नाही

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा भाग नाही, त्यामुळे या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष अर्शदीप सिंगवर असणार आहे. अर्शदीप सिंगने अलीकडच्या काळात आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. अर्शदीप सिंग शेवटच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहप्रमाणे यॉर्कर टाकण्यासाठी ओळखला जातो.

ऑस्ट्रेलियाचा पराभव

अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 3 षटके टाकताना 2 च्या इकॉनॉमीमध्ये केवळ 6 धावा दिल्या आणि 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. अर्शदीप सिंगची ही घातक गोलंदाजी टीम इंडियासाठी टी-20 विश्वचषक 2022 पूर्वी चांगली चिन्हे आहेत. या सामन्यात अर्शदीप सिंग व्यतिरिक्त युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारने 2-2 विकेट घेतल्या. यजुवेंद्र चहलला या सामन्यापूर्वी विकेट्स मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता, परंतु या सामन्यात त्याने 15 धावांत 2 बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT