Arshdeep Singh Celebration Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: "हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होतं!", अर्शदीपच्या खास 'डान्स स्टेप'चा व्हिडिओ तुफान व्हायरल; चाहत्यांचं जिंकलं मन

Arshdeep Singh Celebration Video: विकेट घेतल्यानंतर अर्शदीपने मैदानावर केलेल्या एका खास सेलिब्रेशनने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. सामना संपल्यानंतर प्रसारकांशी बोलताना त्याने या सेलिब्रेशनमागील खास गुपित उघड केले.

Manish Jadhav

Arshdeep Singh Celebration Video: भारत-न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑकलॅंडच्या ईडन पार्क मैदानावर भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी पाहायला मिळाली. भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय पूर्णपणे योग्य ठरला, कारण भारतीय गोलंदाजांनी यजमान किवी संघाचा डाव अवघ्या 185 धावांवर गुंडाळला.

ऑकलॅंडमधील परिस्थितीचा अंदाज घेऊन प्लेइंग इलेव्हनमध्ये चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्याचा निर्णय रणनीतिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी ठरला. या सामन्यात डावाची सूत्रे हाती घेत युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने आपल्या 10 षटकांत 70 धावा देत सर्वाधिक 4 महत्त्वाचे बळी टिपले आणि न्यूझीलंडच्या (New Zealand) फलंदाजीचे कंबरडे मोडले.

विकेट घेतल्यानंतर अर्शदीपने मैदानावर केलेल्या एका खास सेलिब्रेशनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. सामना संपल्यानंतर प्रसारकांशी बोलताना त्याने या सेलिब्रेशनमागील खास गुपित उघड केले. अर्शदीपने सांगितले की, हे सेलिब्रेशन त्याच्या गर्लफ्रेंडसाठी होते. जेव्हा ते दोघे बाहेर फिरायला जातात, तेव्हा असे भन्नाट डान्स स्टेप्स करतात आणि जेव्हा कधी कोणाचा मूड खराब असतो, तेव्हा याच सेलिब्रेशनच्या माध्यमातून ते एकमेकांचा उत्साह वाढवतात.

याशिवाय, आपल्या गोलंदाजीबद्दल बोलताना अर्शदीपने प्रामाणिकपणे कबुली दिली की, डावाच्या शेवटी सर्वच गोलंदाज विकेट घेण्याच्या घाईत होते. संपूर्ण डावात ज्या अचूक रणनीतीचा वापर केला, त्यावरच कायम राहणे गरजेचे होते. या दमदार कामगिरीसह अर्शदीप सिंहने एका विशेष विक्रमातही आपले नाव नोंदवले. न्यूझीलंडच्या भूमीवर एकाच वनडे सामन्यात 4 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो केवळ 5 वा भारतीय गोलंदाज ठरला.

या यादीत भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे 33 धावांत 5 बळींसह अव्वल स्थानी आहे, तर जवागल श्रीनाथ, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांच्यानंतर आता अर्शदीपनेही या एलिट क्लबमध्ये आपले स्थान पक्के केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Double Century: 28 षटकार, 53 चेंडू अन् 204 धावा! 15 वर्षीय 'वैभव'चा ऐतिहासिक धमाका, झळकावले सर्वात वेगवान द्विशतक; वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय

Surya Gochar 2026: वर्ष संपण्यापूर्वी 'या' 5 राशींची चांदी! सूर्य गोचरने बदलणार दिवस; होणार मोठा धनलाभ

Goa Politics: पर्रीकरांचा करिष्मा नाही, विरोधकांची एकजूटही नाही; गोव्यात भाजपपुढे सत्तेचे आव्हान

Pakistan Sindh Protest: कराचीच्या रस्त्यांवर 'सिंधुदेश'चे नारे! असीम मुनीरच्या विरुद्ध उसळला जनक्षोभ; पाकिस्तानच्या विभाजनाची चाहूल?

Satish Timbale Trophy: बंद पडलेल्या शालेय क्रिकेटला पणजी जिमखान्याची संजीवनी; 16 वर्षांखालील 8 संघ भिडणार

SCROLL FOR NEXT