Arjun Tendulkar | Prithvi Shaw Dainik Gomantak
क्रीडा

Prithvi Shaw: 'मित्रा, धैर्य ठेव...', अर्जुन तेंडुलकरचा जिगरी यार पृथ्वी शॉ याला स्पेशल मेसेज

Arjun Tendulkar: पृथ्वी शॉ याला इंग्लंडमधील वनडे कप स्पर्धेतून बाहेर व्हावे लागल्यानंतर अर्जुन तेंडुलकरने खास मेसेज त्याला दिला आहे.

Pranali Kodre

Arjun Tendulkar special Massage to Prithvi Shaw:

भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ नुकताच इंग्लंडमध्ये रॉयल लंडन वनडे कप खेळण्यासाठी गेला होता. त्याने नॉर्थंम्पटनशायर संघाकडून खेळताना दमदार कामगिरीही केली. मात्र दुर्दैवाने त्याला चारच सामन्यानंतर या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. त्याचमुळे त्याचा जिगरी मित्र अर्जुन तेंडुलकरने त्याला खास मेसेज दिला आहे.

शॉ याला 13 ऑगस्ट रोजी डरहॅमविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गुडघ्याची दुखापत झाली आहे. त्याच्या दुखापतीचे स्कॅन केल्यानंतर असे समजले आहे की तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

विशेष म्हणजे दुखापतीनंतरही पृथ्वी शॉ डरहॅमविरुद्ध फलंदाजीसाठी उतरला होता. त्याने दमदार फलंदाजी करताना 76 चेंडूत नाबाद 125 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 7 षटकार मारले होते. त्याच्या या खेळीच्या जोरावर नॉर्थहॅम्प्टनशायरने ६ विकेट्सने विजय मिळवला होता.

दरम्यान, शॉ याला या सामन्यानंतर वनडे कप स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. तसेच त्याला साधारण 2 महिने तरी क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. त्याचमुळे त्याला लहानपणापासूनचा मित्र आणि मुंबई व गोव्याचा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरने शुभेच्छा दिल्या आहेत.

Arjun Tendulkar | Prithvi Shaw

अर्जुनने इंस्टाग्रामवर स्टोरीवर शॉ बरोबरचा फोटो पोस्ट करत कॅप्शन दिले आहे की 'मित्रा धैर्य ठेव आणि लवकर बरा हो.'

अर्जुन आणि शॉ यांनी मुंबईकडून अनेकदा वयोगटातील क्रिकेट एकत्र खेळले आहे. त्यामुळे त्यांच्यात अनेक वर्षांपासून चांगली मैत्री आहे. यापूर्वीही अनेकदा अर्जुन शॉ याला पाठिंबा देताना दिसला आहे.

शॉ याने पाडली छाप

शॉ नॉर्थहॅम्प्टनशायरकडून चारच सामने खेळला असला, तरी त्याने त्याची वेगळी छाप पाडली आहे. त्याने नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळतानाच त्याच्या लिस्ट ए क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी केली.

त्याने सोमरसेटविरुद्ध 244 धावांची द्विशतकी खेळी केली होती. त्याने 153 चेंडूत 28 चौकार आणि 11 षटकारांसह 244 धावांची खेळी केलेली. त्यामुळे चार सामन्यातच त्याने 429 धावा केल्या होत्या.

नॉर्थहॅम्प्टनशायरने दिलेल्या माहितीनुसार शॉ लंंडनमध्ये तज्ञ डॉक्टरांची भेट घेतली आहे. तसेच आता त्यावर बीसीसीआयचे वैद्यकिय पथक लक्ष ठेवेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT