Prithvi Shaw second Century in One-Day Cup 2023 for Northamptonshire:
इंग्लंडमध्ये सध्या रॉयल लंडन वनडे कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताया युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ शानदार कामगिरी करत आहे. त्याने नुकतेच रविवारी या स्पर्धेतील सलग दुसरे शतक ठोकले आहे.
रविवारी नॉर्थहॅम्प्टनशायर संघाकडून डरहॅमविरुद्ध खेळताना शॉ याने नाबाद शतक करत संघाला विजयही मिळवून दिला. चेस्टर-ल-स्ट्रीट येथे झालेल्या सामन्यात शॉ याने ६८ चेंडूतच त्याचे शतक पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने चौकार अन् दोन सलग षटकार मारत नॉर्थहॅम्प्टनशायरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
शॉ या सामन्यात 76 चेंडूत 125 धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे नॉर्थहॅम्प्टनशायरने 199 धावांचे आव्हान 25.4 षटकात 4 विकेट्स गमावत 204 धावा करत सहज पूर्ण केले.
नॉर्थहॅम्प्टनशायरकडून शॉ व्यतिरिक्त रॉब केओफने 42 धावांची खेळी केली. तसेच डरहॅमकडून जॉर्ज ड्रिसेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले.
तत्पुर्वी डरहॅमने प्रथम फलंदाजी करताना 43.2 षटकात सर्वबाद 198 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून लियाम ट्रेवास्कीसने सर्वाधिक 37 धावा केल्या. तसेच जोनाथन बुशनेलने 32 आणि कर्णधार ऍलेक्स लीसने 34 धावांची खेळी केली.
या तिघांव्यतिरिक्त कोणालाही 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. नॉर्थहॅम्प्टनशायरकडून ल्युक प्रोक्टरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, याच स्पर्धेत 9 ऑगस्ट रोजी शॉ याने सोमरसेटविरुद्ध खेळताना डबल धमाका केला होता. त्याने या सामन्यात शानदार द्विशतकी खेळी केली होती. त्याने 153 चेंडूत 244 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने तब्बल 28 चौकार आणि 11 षटकार मारले होते.
ही त्याची लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी देखील ठरली. 23 वर्षीय शॉ सध्या सुरु असलेल्या वनडे कपमधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.