Football Dainik Gomantak
क्रीडा

केपे मतदारसंघात मेगा फुटबॉल महोत्सवाची घोषणा!

केपे मतदारसंघात लवकरच फुटबॉल अकादमी ; समाजसेवक एल्टन डिकॉस्ता यांची घोषणा.

दैनिक गोमन्तक

केपे मतदार संघात लवकरच फुटबॉल (Football) अकादमीची स्थापना केली जाईल. तेथे सर्व प्रकारच्या साधन सुविधा उपलब्ध केल्या जातील. या अकादमीतर्फे केपे मतदार संघातील युवा फुटबॉलपटूंना आपले तंत्र अधिक विकसीत करण्याची संधी प्राप्त होईल असे केपे येथील समाज सेवक एल्टन डिकॉस्ता यांनी सांगितले. केपे मतदारसंघ मेगा फुटबॉल महोत्सवाची घोषणा केली आणि फुटबॉल स्पर्धे साठी दोन लाख रुपये बक्षिसाची घोषणा दाखील केली.

फुटबॉल बरोबर इतर खेळांच्या विकासासाठीही प्राधान्य दिले जाईल असे ते म्हणाले. ही स्पर्धा आयोजित करण्यामागे कुठलेही राजकारण (politics) नाही. राजकारण व खेळ हे दोन वेगळे विषय आहेत. केवळ केपे मतदारसंघातील युवा फुटबॉलपटूंचा दर्जा सुधारण्याच्या हेतुनेच ही स्पर्धा आयोजित केल्याचे ते म्हणाले.

फुटबॉल प्रशिक्षक सुकोरिनो वाझ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सांगितले की गोव्यात फुटबॉलचा दर्जा घसरला आहे. याचे प्रमुख कारण फुटबॉलकडे केवळ आर्थिक दृष्टिकोनातुन पाहिले जाते. फुटबॉलची मुल्ये मैदानावर दिसत नाहीत. वेटरन फुटबॉल (Football) पेक्षा ग्रासरुट स्तरावर फुटबॉलच्या स्पर्धा आयोजित करणे योग्य ठरेल. महिला फुटबॉलचा विकास होणेही तेवढेच महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.

या प्रसंगी केपे मतदारसंघ (Constituency) मेगा फुटबॉल महोत्सवाच्या आकर्षक चषकांचे व जर्सीचे अनावरण करण्यात आले. ही स्पर्धा 10 ऑक्टोबरपासुन आंतरवाडा, पंचायत व नगरपालिका स्तरावर सुरु झाली असुन त्यातील विजेते संघ 13 व 14 नोव्हेंबर रोजी साखळी सामने खेळणार आहेत. यात खोला, बार्से, बेतुल, फातोर्पा, अवेडे, केपे नगरपालिका, मोरपिर्ला येथील 12 संघांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Art Exhibition: 'स्टिल/गोवा'मधून दिसणार गोव्याची अनोखी कहाणी; 1994 ते 2004 चा काळ छायाचित्रांतून जिवंत

Surya Gochar 2026: प्रेमसंबंधात गोडवा अन् करिअरसह व्यवसायात भरभराट! सूर्याचं धमाकेदार गोचर; 5 राशींचं उजळणार नशीब

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

SCROLL FOR NEXT