दिवाळीनंतर वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही आजपर्यंत खात्यात वेतन जमा न झाल्याने मुरगाव (Mormugao) पालिका कर्मचारी हवालदिल झाले आहेत. वास्कोतील (Vasco da Gama) 'अ' दर्जाची मुरगाव नगरपालिकेत शहरातील मोठ-मोठ्या आस्थापनांची, कंपनी, दुकानांची थकबाकी वसुली व्यवस्थित होत नसल्याने सध्या पालिका तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे.
त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन करणे मुख्याधिकार्यांना डोईजड होत आहे. हा उपक्रम आता नित्याचाच बनला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण कधी एक महिन्याचा, तर कधी दोन तीन महिन्याचा पगार करणेही पालिकेला मुश्कीलीचे झाले आहे. त्यामुळे याचा नाहक त्रास कर्मचाऱ्यांना सोसावा लागतो. कारण कित्येक कर्मचारी कर्जबाजारी आहेत आणि त्यांचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेल्या वेतनातून वजा केले जात आहे. दरम्यान गेल्या महिन्याचे वेतन आज पर्यंत खात्यात जमा न झाल्याने बँक हप्ता वसुलीसाठी (Bank installment recovery) तगादा लावल्याने कर्मचाऱ्यांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे न झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांना याविषयी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना जाब विचारले असता पालिका तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याचे कारण पुढे करून, आधी आम्ही दिवाळीचा बोनस देऊ, दिवाळीनंतर पाच तारीखेच्या अगोदर खात्यात वेतन जमा करू असे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले.
मात्र आता 11 तारीख झाली, तरी आज पर्यंत वेतन न मिळाल्याने कर्मचारी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे. तसेच त्यांचे गणवेशा साठीची रक्कमही देण्यात आली नाही. बँका हप्ता वसुलीसाठी तगादा धरतात अशा नानाविध कारणांनी त्यांना चिंता भेडसावत आहे. काय करावे काय नाही असा प्रश्न सध्या कर्मचाऱ्यांसमोर पडला आहे. दिवाळी कशीबशी साजरी केली आता पुढे काय ? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
दरम्यान पालिकेच्या वेळकाढू धोरणामुळे पालिका कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याच्या मार्गावर दिसुन येत आहेत, अन्यथा वेतन खात्यात जमा होणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.