फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीस सुरुवात

73 व्या मिनिटास गिल्बर्ट ऑलिव्हेरा (Gilbert Oliveira) याने केलेल्या गोलमुळे गार्डियन एंजलला पुन्हा आघाडी मिळाली
धर्मापूर पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र सिनारी यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार स्वीकारताना गार्डियन एंजल क्लबचा जॉन्सन होर्ता.
धर्मापूर पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र सिनारी यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार स्वीकारताना गार्डियन एंजल क्लबचा जॉन्सन होर्ता.Dainik Gomantak

पणजी: गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबने 17 व्या गोवा पोलिस कप फुटबॉल (football) स्पर्धेची गुरुवारी आल्बर्ट डेव्हलपर्स संघावर 2-1 फरकाने विजय मिळविला. सामना धर्मापूर (Dharmapur) येथील मैदानावर झाला.

गार्डियन एंजल क्लबने 39 व्या मिनिटास जॉन्सन होर्ता याने केलेल्या गोलमुळे आघाडी घेतली. विश्रांतीनंतर आल्बर्ट डेव्हलपर्स संघाने बरोबरी साधली. शुभम देसाई याने 51 व्या मिनिटास हा गोल केला.

धर्मापूर पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र सिनारी यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार स्वीकारताना गार्डियन एंजल क्लबचा जॉन्सन होर्ता.
गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेचे पुनरागमन

73 व्या मिनिटास गिल्बर्ट ऑलिव्हेरा (Gilbert Oliveira) याने केलेल्या गोलमुळे गार्डियन एंजलला पुन्हा आघाडी मिळाली व त्यांनी ती शेवटपर्यंत टिकविली. विजयी संघाचा पहिला गोल केलेला जॉन्सन सामन्याचा मानकरी ठरला.

स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीस आता शनिवारपासून सुरवात होईल. या फेरीतील पहिली लढत FC Goa आणि सेझा फुटबॉल (Seja football) अकादमी यांच्यात खेळली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com