Anil Kumble & Dinesh Karthik presented debut cap to Sarfaraz Khan & Dhruv Jurel  X/BCCI
क्रीडा

IND vs ENG, Video: 'ही मोठ्या करियरची सुरुवात...', कुंबळे-कार्तिकच्या शब्दांनी पदार्पणवीर सर्फराज-जुरेलला बळ

Sarfaraz Khan - Druv Jurel Debut: भारत वि. इंग्लंड तिसऱ्या कसोटीआधी सर्फराज खानला अनिल कुंबळेच्या हस्ते, तर ध्रुव जुरेलला दिनेश कार्तिकच्या हस्ते कसोटी पदार्पणाची कॅप देण्यात आली.

Pranali Kodre

Anil Kumble and Dinesh Karthik inspirational speech for Sarfaraz Khan and Druv Jurel during Presenting Debut Cap:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी राजकोटला सुरू झाला आहे. निरंजन शाह स्टेडियमवर होत असेलल्या या सामन्यातून भारताकडून सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांचे पदार्पण झाले आहे.

सर्फराज आणि जुरेल कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करणारे 311 आणि 312 वे खेळाडू ठरले. इतकेच नाही, तर हे त्यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही ठरले. दरम्यान, सर्फराजला माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या हस्ते, तर ध्रुव जुरेलला यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकच्या हस्ते त्यांच्या कसोटी पदार्पणाची कॅप देण्यात आली.

यावेळी कुंबळेने सर्फराजला आणि कार्तिकने जुरेलला खास संदेश दिले. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

कुंबळेने सर्फराजला त्याची कॅप देण्यासाठी म्हटले की 'तू ज्याप्रकारे इथपर्यंत आला आहे, ते पाहून तुझ्याबद्दल अभिमान वाटत आहे. मला खात्री आहे तुझ्या वडीलांना आणि कुटुंबियाना तुझ्या यशाबद्दल अभिमान वाटत असेल.'

'मला माहित आहे तू खूप मेहनत घेतली आहेस. काहीवेळा निराशाही येते, पण असे असतानाही तू ज्या धावा देशांतर्गत क्रिकेटमध्ये केल्या आहेत, त्यामुळे तू आज इथे आहेस.'

'तुझे कौतुक. मला खात्री आहे तू अनेक चांगल्या आठवणी तयार कशील. मोठ्या कारकिर्दीची ही एक सुरुवात आहे. तुझ्याआधी फक्त 310 खेळाडू कसोटी खेळले आहेत.'

यानंतर कुंबळेने 311 क्रमांकाची कसोटी कॅप सर्फराजच्या डोक्यावर चढवली. यानंतर जुरेलला 312 क्रमांकाची कॅप देण्यापूर्वी कार्तिकने जुरेलच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन केले. तसेच म्हटले की त्याने केलेल्या आत्तापर्यंतच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.

तसेच त्याने म्हटले की 'या प्रवासात तुला अनेकांनी मदत केली असेल, ते सर्व आज तुला पाहात आहेत.' त्याचबरोबर कार्तिक म्हणाला की 'क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारापेक्षा कसोटी क्रिकेट खास आहे. हा कठीण प्रकार आहे, पण कसोटी खेळताना समाधान मिळते. त्याचबरोबर जे कुटुंबिय तुला आत्ता इथून पाहात आहेत, त्यांना तुझा अभिमान वाटत असले.'

याशिवाय कार्तिकने जुरेलला शुभेच्छा देताना असेही सांगितले की गेल्या 10 वर्षात साधारण 30 खेळाडूंनाच आत्तापर्यंत भारताकडून कसोटी पदार्पण करता आले आहे, त्यामुळे हा कठीण प्रकार आहे. त्याचमुळे या प्रकारात पदार्पण करणे खास आहे.

सर्फराजला या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये श्रेयस अय्यरच्या जागेवर संधी मिलाली आहे, तर जुरेलला यष्टीरक्षक केएस भरतच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.

  • तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

SCROLL FOR NEXT