IND vs ENG: सर्फराज अन् जुरेलचे झाले पदार्पण, तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात चार बदल; पाहा प्लेइंग-11

India vs England, 3rd Test: राजकोटमध्ये होत असलेल्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत.
Dhruv Jurel & Sarfaraz Khan
Dhruv Jurel & Sarfaraz Khan X/BCCI
Published on
Updated on

India vs England, 3rd Test Match at Rajkot, Playing XI:

भारत आणि इंग्लंड संघात सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील तिसरा सामना राजकोटला गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेर जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघात 4 बदल

या सामन्यासाठी भारतीय संघाने चार बदल केले आहेत. श्रेयस अय्यर उर्वरित मालिकेसाठी संघात नसल्याने त्याच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्फराज खानला संधी देण्यात आली आहे. तसेच यष्टीरक्षक केएल भरतच्या जागेवर ध्रुव जुरेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडण्यात आले आहे.

याशिवाय दुखापतीतून सावरल्यानंतर रविंद्र जडेजाचे भारतीय संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. त्याला अक्षर पटेलच्या जागेवर संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मोहम्मद सिराजचेही पुनरागमन झाले असल्याने मुकेश कुमारला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे.

Dhruv Jurel & Sarfaraz Khan
IND vs ENG: इंग्लंडला मोठा धक्का! भारताविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेतून अनुभवी गोलंदाज बाहेर

दरम्यान, सर्फराज आणि जुरेलला या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्याने त्यांचे हे कसोटी पदार्पणही आहे.

इंग्लंड संघातही एक बदल

इंग्लंडनेही तिसऱ्या कसोटीसाठी एक बदल केला आहे. त्यांनी फिरकीपटू शोएब बशीरच्या जागेवर वेगवान गोलंदाज मार्क वूडला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. याव्यतिरिक्त कोणताही बदल इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये केलेला नाही.

त्यामुळे बशीर व्यतिरिक्त विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडकडून खेळलेले सर्व 10 खेळाडू राजकोट कसोटीतही खेळणार आहेत.

Dhruv Jurel & Sarfaraz Khan
IND vs ENG: राजकोटमध्ये रंगणार तिसरा कसोटी सामना; जाणून घ्या कसा आहे भारताचा या मैदानावरील रेकॉर्ड

स्टोक्सचा 100 वा सामना

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना आहे. तो 100 कसोटी सामने खेळणारा जगातील 76 वा खेळाडू आहे, तर इंग्लंडचा 16 वा खेळाडू आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

  • इंग्लंड - झॅक क्रावली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हर्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com